दु:खांत सुख - Page 233

दु:खांत सुख १८९

समाजाच्या वर्गवारी घड्या गुणभेद विभागशः किंवा जातिभेद विभागशः या दोहोंपैकी कोणत्याहि पाटावर घातल्या तरी त्या सारख्याच पडत. दोन्हीं प्रकारच्या घड्यांत तिडेंबाकें फारसें कोठें होत नसे. याचें कारण जाती जशा जन्माने श्रेष्ठ तशा गुणानेंहि श्रेष्ठ असत, व जन्मानें कनिष्ट तशा गुणानेंहि कनिष्ट असत. यावरुन श्रेष्ठ जातींचे श्रेष्ठ गुण व कनिष्ट जातींतील कनिष्ट गुण यांची ही सांगड, हा कांही दैविक प्रकार होता, असें कोणी मानूं नये. कनिष्ट मानलेल्या जाती गुणानेंहि कनिष्ट राहिल्या याचें मुख्य कारण असें कीं, त्यांना गुणवान्‌ होण्याची कायदेशीर बंदी करण्यांत आलेली होती. हें मनुस्मृतीसारख्या स्मृतिग्रंथावरून सर्वांस कळून येण्यासारखें आहे. पण इंग्रजी अमदानीत या बंदीचा साफ उच्छेद होऊन गेल्यामुळें समाजाची पूर्वीची घडी बिघडून गेली; व ब्राह्मणाच्या पोटीं गुणहीन शूद्रवृत्तीची संतति आणि शूद्रांच्या पोटीं गुणवान्‌ ब्राह्मणवृत्तीची संतति जन्माला येऊ लागली. अशापरी गुणाचा आणि जातीचा प्रत्यक्ष विरोध उत्पन्न झाला असल्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीला आज एवढा जोर आलेला दिसत आहे. हा विरोध नष्ट करण्यास ब्राह्मण्याचा नायनाट होणें अगदी अवश्य आहे. ब्राह्मण्यापासून हिंदुसमाजाचें किती अपरिमित नुकसान झालें आहे हें सर्वास कळून Yoo आहे. या ब्राह्मण्यामुळे ब्राह्मणेतर जनतेस विद्येची द्वारें बंद करण्यांत येऊन त्यांना अडाणी ठेवण्यांत आलें. वेदांसारखे धार्मिक ग्रंथसुद्धां वाचण्याची बंदी करण्यांत आली. जातीशिवाय गति नाहीं, या आकुंचित तत्वज्ञानाचे अमंगल जीवन जनतेस पाजून अखिल जनतेच्या मनोभावना अनुदार करण्यांत आल्या. श्रेष्ठ व कनिष्ट हा भेदभाव जन्मावरून ठरवून वैयक्तिक उन्नतीला व सुधारणेला अवश्य लागणारा अवसर नाहींसा करण्यात आला. विधीपुढें यत्न विफल आहे, या शिकवणीनें सर्वांची गति खुंटवून टाकली. धर्मभोळेपणा वाढवून खऱ्या धर्माचे ज्ञान होऊ दिलें नाहीं. सोंवळ्याओवळ्याच्या व शिवाशिवीच्या कल्पना पसरवून लोकांना माणूसकीसारख्या अमोल वस्तूचा धिक्कार करण्यास शिकविलें. ब्रिटिश साम्राज्यांतील आंग्लाईमुळें या देशाचे आत्यंतिक नुकसान झाले आहे, असें जें मोठ्या भडक रंगांत नेहमीं सांगतात त्यांना ब्राह्मणाईपासून हिंदू समाजाचें किती नुकसान झालें आहे याची नीटशी कल्पना असावी असें दिसत नाहीं. आमच्या मतें आंग्लाई व ब्राह्मणाई या हिंदी जनतेच्या आंगाला लागलेल्या दोन जळवा आहेत, व त्या एकसारख्या हिंदुलोकांच्या रक्‍ताचा शोष करीत आहेत. areas सत्तेनें लोकांना देहानें गुलाम बनविले, तर ब्राह्मणाईनें जनतेच्या आत्म्याला गुलाम करुन ठेविलें. आंग्लाईनें हिंदुस्थानातील संपत्तीचें शोषण केलें तर ब्राह्मणाईनें स्वाभिमानासारख्या आत्मिक संपत्तीचे हरण केलें आहे. असें असता, सर्व प्रकारच्या उन्नतिकारक चळवळींना आपल्याशा