दु:खांत सुख - Page 234

१९० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

करून टाकणाऱ्या ब्राह्मण लोकांनीं ब्राह्मणेतर चळवळींत पडूं नये, ही नवलाची गोष्ट नव्हे काय ? ब्राह्मण लोक सर्व प्रकारच्या चळवळींत धडाडीनें भाग घेतात. राजकीय चळवळ हें तर त्यांचे जीवनच आहे. एक वेळ त्यांना जेवण न मिळालें तरी चालेल. पण दिवसाच्या चोवीस तासांतून राजकारणाच्या ताकाचा एखादा भुरका जर त्यांना मिळाला नाहीं तर त्यांना अमांशाची पीडा होण्याचा संभव असतो. सामाजिक सुधारणेच्या चळवळींतहि त्यांचें अंग असतें. विधवाविवाह, बालविवाह, केशवपन, वगैरे सामाजिक प्रश्नांसंबंधी त्यांनीं आस्था दाखविली आहे. मजूर वर्गाच्या वतीनें भांडवलशाहीशीं वाद घालणाऱ्या चळवळीचे ते पुरस्कर्ते होऊ शकतात-नव्हे तर बोल्शेविझम्‌ व कॉम्युनिझमसारख्या आर्थिक हितसंबंधांत क्रांति घडवून आणणाऱ्या चळवळी या देशांत आणून त्या पाडाला लावण्यास ब्राह्मणच कारणीभूत झाले आहेत. असें असतां फक्त ब्राह्मण्यविध्वंसनाच्या शुभ कार्यातच त्यांना भाग घेण्याची इच्छा होत नाहीं. इतकेंच नव्हें, तर ब्राह्मण्यापासून होणाऱ्या अनिष्ट परिणामासंबंधीं ब्राह्मण लोकांस कोणी जबाबदार धरलें, तर ज्याचा त्याचा ब्राह्मणावर कटाक्ष कां ? असा उलटा सवाल ते करतात. " ब्राह्मणांना जें वर्चस्व प्राप्त झाले तें त्यांच्या करामतीमुळें . . . ज्यास शहाणपण व सामर्थ्य आहे, त्यांना दुसऱ्यांवर आपलें वर्चस्व बसवावेंसे वाटतें

व त्यांस तें बसवितांहि येतें . . . . . . ब्राह्मणांनी धर्मवर्चस्व मिळविले तें लोकांच्या

माना कापून नव्हें, तर शुद्ध मन बळानें ब्राह्मणांनी दुसऱ्या जातींस अज्ञानाच्या अंधकारांत चांचपत ठेंचा खाण्यास लाविले. . . .. हन स्वाभाविक दिसतें..... शहाणपणा अंगीं असल्यावर त्यापासून आपलें हित करून घेण्याचा कोण प्रयत्न करीत नाही ? एकाच्या अज्ञानाचा फायदा दुसऱ्यास मिळाला नाहीं, असें कोठें झालें नाहीं ? धर्माची किल्ली एकदां हातीं सापडून लोकांची मनें वश करून घेतां आल्यावर धर्माधिकाऱ्यांनीं हरेक प्रकारचा अंमल त्यांच्यावर चालविण्याची खटपट केल्याची उदाहरणें प्रत्येक देशाच्या इतिहासात सांपडतात. . . . . बळी तो कान पिळी अशी एक जगाची राहटी आहे . . .. . ““ अशा प्रकारची एकाद्या धर्मलंडाची भाषा *केसरीसारख्या थोर पत्रानें ब्राह्मण जातीच्या आपमतलबी धोरणाचें समर्थन करण्याकरितां जनाची किंवा मनाची कांहींच लाज न धरतां काढली आहे. महाडच्या प्रकरणांत जेव्हां आम्हीं शेटजी भटजींस दोष दिला तेव्हां देखील अस्पृश्यता निवारणाचा मक्ता ब्राह्मणांनींच घेतला आहे काय,

*केसरी दि. १५ व २२ मार्च १८८१ “ ज्याचा त्याचा ब्राह्मणांवर कटाक्ष का ? “ याशिर्षकाचा लेख विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी केसरीत लिहिला, त्यातील हा काही भाग. पाहा, “ विष्णुपदी : तृतीय खंड “-संपादक श्री. ना. बनहट्टी, द्वि. आ. १९७४ सुविचार प्रकाशन मंडळ, पुणे, नागपूर. पृ. १७५-१८०.