दु:खांत सुख - Page 237

दु:खांत सुख १९३

पक्षांचें समाधान होत असेल तर आम्ही त्यांच्या तर्फे या वादांत साक्ष देण्यास तयार आहोंत. ब्राह्मणेतर जनतेनें यांत भाग घेतला होता, तो केवळ ब्राह्मणांच्या सांगण्यावरून घेतला होता, या विधानांनींहि ब्राह्मणेतर पक्षाचें भागत असेल, तर तेहि कबुल करण्यास आमची हरकत नाहीं. परंतु या एवढ्यावरूनच ब्राह्मणेतर पक्ष कृतार्थ झाला असें होत. असेल तर ब्राह्मणेतर पक्षाचे कार्य कोणतें याचे आम्हास गुढ पडते. ब्राह्मणेतर पक्षाची जरूरी आहे ती केवळ ब्राह्मण्यनाशासाठी, ब्राह्मण लोक पुढें येत नाहींत म्हणून त्यांना सुळावर देण्यासाठी आहे असें आम्हास वाटत नाहीं. आजवर ब्राह्मणेतरांतील ब्राह्मण्य घालविण्यास ब्राह्मणांनी कांहीच केलें नाही म्हणून तें घालविण्याची जबाबदारी आपली आपणच घ्यावी, हाच या ब्राह्मणेतर पक्षाचा मुख्य हेतु असला पाहिजे. व याच दृष्टीनें आम्ही ब्राह्मणेतर पक्षाच्या हालचालीकडे पहात असतों. आम्हाला अपेक्षा होती कीं, आमचे ब्राह्मणेतर बंधु आपली या बाबतींतील जबाबदारी ओळखून आपल्या ज्ञातिबंधूंस अशा दुराचारापासून परावृत्त करण्याचा कांहीं तरी विधायक कार्यक्रम आंखतील. पण तें कांहीं न करतां जें केलें तें ब्राह्मणांनी केलें व आम्हीं जें फेलें तें त्यांच्या सांगण्यावरून केलें, अशी कैफियत देऊन ते नामानिराळे झालें. "पण या सबबीचें बिचाऱ्या अस्पृश्यांना काय होय? त्यांना विघ्न झालें हैं खरें ! विघ्न केलें, तें आपल्या अक्कल हुशारीनें केलें. किंवा दुसऱ्यांच्या चिथावणीवरून केलें ही बाब क्षुल्लक आहे. शिक्षेच्या शमनार्थ फार तर तिचा उपयोग होईल. पण तिच्यावर भिस्त ठेवून दोषमुक्ततेची अपेक्षा आमच्या ब्राह्मणेतर बंधूंनी. करावी हें आमच्या मतें अगदीं कोत्या बुद्धीचें निदर्शक आहे.

दु:खांत सुख एकच, व ते हें कीं, आमचे मित्र रा. जवळकर व जेधे या ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनीं “ चवदार “ तळ्याच्या बाबतींत महाड येथे अस्पृश्यांबरोबर सत्याग्रह करण्याची तयारी दाखविलेली आहे, हें होय. या आश्वासनाबद्दल आम्हीं त्यांचें आभारी आहोंत. पण त्यांच्याहिपेक्षां वन्हाडांतील आमच्या ब्राह्मणेतर बंधूंचे आम्ही विशेष आभारी आहोंत. आमच्या मुंबईकर ब्राह्मणेतर बंधूपेक्षां वऱ्हाडांतील ब्राह्मणेतर बंधूंना अस्पृर्यतानिवारणाची जास्त कळकळ आहे, हें उभय प्रांतांतील ब्राह्मणेतर पक्षांची पत्रें वाचणाऱ्या वाचकांस सांगावयास नको. आमची खात्री आहे कीं, रा. जेधे व जवळकर हे जर वर्‍हाडांत गेले नसते तर त्यांना ही कल्पनांच सुचली नसती. PAR असो, ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनी या कामीं सक्रीय सहानुभूति दाखविण्याचे मनांत आणलें आहे ही गोष्ट ब्राह्मणेतर चळवळीला भूषणावह आहे. महाडला सत्याग्रह करण्याचा आमचा मानस आम्हीं यापूर्वीच जाहीर केला आहे, हें आमच्या बहिष्कृत भारताच्या दुसऱया अंकांतील अग्रलेखावरून स्पष्टपणें दिसून येईल. हा मार्ग अडीअडचणीचा आहे, असें बरेच लोक आम्हांस सांगत आहेत. आम्हीं “ फाजील ऊतावळेपणा करीत आहोंत “, “ स्पृश्य वर्गाच्या

डब्ल्यू-२०७३-१३ अ