४४
व्यक्तीला जरुर ते स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही तर
त्याचे नैतिक परिणाम व्यक्ती व समाज यांच्यावर
सारखेच अनिष्ट होतात
मुसलमान लोक खाण्यापिण्याच्या बाबतींत जरी मोठे रंगेल असले तरी रमजान महिन्यांतील त्यांचे उपोषण फारच कडकडीत असतें. उपोषणकालांत पाणी पिण्याची सुद्धा मनाई असते. इतकेंच नव्हे तर आवंढा देखील परतण्याची त्यांना मनाई असते. एका फकिराची गोष्ट सांगतात कीं, त्याला उपास करणें प्राप्त होतें. पण उपासाचा कडकपणा त्याला अगदी असह्य वाटे. तेव्हां पाण्याचा घुटका तर प्यावयास मिळावा, पण लोकांना ते कळू नये अशी एक युक्ति शोधून काढण्याच्या विचारास तो लागला. त्यावर त्याला अशी एक कल्पना सुचली कीं
आपण रोज नदीवर स्नानाला जावें व पाण्यांत बुडी मारून आंत एक घुटका घेऊन
वर यावें म्हणजे तहानही भागेल आणि आपण उपास मोडला असें कोणाला कळणारहि नाही. ही नामी युक्ति त्याला इतकी पसंत पडली की, त्यानें हें मानभावी स्नान आपल्या दिनचर्येतील एक नित्याचा क्रम करून ठेविला. बऱयाच दिवसांच्या अनुभवानें ही अंदरकी बात कोणासच कळणार नाहीं, अशी त्याची खातरजमा झाल्यामुळें “मैं करता हूं, ओ खुदाभी देखता नहीं” असें तो लोकांस सांगत फिरत असे. परंतु पाप कधीं ना कधीं उघडकीस येते, या लोकानुभवाप्रमाणे हा फकीर एके दिवशी पाण्याचा घुटका घेण्यास नदींत उतरला असता एक शिंगटीचा मासा त्यांच्या तोंडात गेला. झटक्यासरशी मासा तोंडात आल्यामुळे पाण्याबरोबर मासा गिळण्याचा प्रयत्न त्यानें केला. पण मासा मोठा व कांटेरी असल्यामुळें तो जो फकिराच्या गळ्यांत अडकला तो आंतही जाईना व बाहेरही निघेना. अशा स्थितींत आपल्या पापाची साक्ष बरोबर घेऊन त्या फकिरास नदीबाहेर शहरांत यावें लागलें. व शेवटीं “मै करतां हूं ओ खुदाभी नहीं देखता,” असें मोठ्या दिमाखाने म्हणणाऱ्या या फकिराची लफ॑गेगिरी चव्हाट्यावर आली.
` असाच कांहींसा प्रकार ह. भ. प. पांगारकर बुवा यांचा झाला, असें आम्हांस वाटतें. रा. पांगारकर हे कांही दिवसांपूर्वी बडोद्याला गेले असतां. त्यांना तेथील रहिवाशीं श्री. विनायक वाकसकर या कायस्थ प्रभू जातीच्या गृहस्थानें फराळांचे आमंत्रण दिलें. तें पांगारकर बुवा यांनीं स्वीकारिलें. त्याप्रमाणे