व्यक्तीला जरूर ते स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही तर त्याचे नैतिक परिणाम व्यक् ती व समाज यांच्यावर सारखेच अनिष्ट होतात - Page 240

१९६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पांगारकर बुवा जातीनें ब्राह्मण असतां या कायस्थ गृहस्थाच्या घरी जाऊन जेवलें। परंतु ही गोष्ट बडोद्याचे प्रोफेसर जोशी यांनी पुण्याच्या ज्ञानप्रकाशांत प्रसिद्ध केली; व पांगारकर बुवांनी जें मनोधैर्य दाखविलें त्याबद्दल त्यांचें अभिनंदनही केलें. परंतु या अभिनंदनानें आनंदित होण्याऐवजीं पांगारकर बुवांनी उलट खाऊन प्रायाश्चित्त घेतले या प्रायाश्चित प्रकरणांत पांगारकर बुवांनी खोटा कोटिक्रम न लढवितां सरळपणा दाखविला आहे, असें भासवून कांहीं जुन्या मताचे लोक त्यांचे गुण गात आहेत. परंतु प्रायाश्चित घेण्याची जीं कारणें पांगारकरांनी दिली आहेत, तीं ध्यानांत घेतां पांगारकर नुसता लपंडाव करीत आहेत असेच म्हणावें लागतें. "ज्या अर्थी वाकसकरांच्या सलगीचे प्रोफेसर जोशी आपण जेवलों असें जाहीर करतात, त्या अर्थी त्यांची समजूत खरी धरून

आपण जुन्या समजुतीच्या लोकांसाठी प्रायाश्चित घेत आहों,” असें श्री. पांगारकर

हे लिहितात. जुन्या लोकांच्या समजुतीसाठीं प्रायाश्चित घेणें हें हल्लीच्या काळांत मोठे निंद्य कृत्य आहे असें आम्हांस वाटतें. पुष्कळसे सुधारणावादी लोक

ase कीं प्रायश्चित घेण्यास नेहमी तयार असतात. व उलट असेंही म्हणतात

कीं “अहो! प्रायाश्चित घेतलें तरी आम्ही ही गोष्ट पुन्हां करणार नाहीं, अशांतला कांहीं भाग नव्हें!” या मताचे लोक सुधारणावादी असतील पण त्यांच्या वर्तनाचा हा प्रकार आम्हांस अगदी गैर वाटतो. प्रायाश्चित्त घेणें याचा अर्थ जी गोष्ट

आपण केली ती गोष्ट वाईट आहे अशी कबुली देणें हा होय. याशिवाय

प्रायाश्चिताला दुसरा कांहीं अर्थ असणें संभवत नाहीं. जो खरा सुधारक आहे, ज्याला आपण करतों तें रास्त आहे अशी ज्याची दृढ भावना आहे, त्यानें अडल्यास प्रायश्चित घेणें यांत दुटप्पीपणा होत नसला तरी मनाचा दुबळेपणा होतो हैं खास. प्रायश्चित्त घेण्यानें तें घेणाऱया लोकांच्या स्वभावाचा कमकुवतपणा दिसतोच. पण त्यामुळें सुधारणेची ।पिछेहाटहि होते. अडल्या पडल्याला सुधारणावादी लोक प्रायश्चित घेण्यास तयार झाल्यास जुन्या मताच्या लोकांना आपल्या आचाराविचारांत फेरबदल करण्याची केव्हांच जरूरी वाटणार नाहीं. उलट सुधारणावादी लोक प्रायश्चित घेतात म्हणजे आपणांस शरण येतात या जाणिवेनें तें सुधारणांना तुच्छ मानतात. व आमचेच खरें असा टेंभा मिरवून जुन्यालाच घट्ट धरून बसतात. रा. पांगारकर हे सुधारणावादी नसले तरी भागवत धर्मी आहेत. व भागवतधर्मात झालेल्या अनेक संतांची चरित्रेंही त्यांनी लिहिली आहेत. यावरून ते किती कट्टे भागवत्‌ धर्मी असावेत हें कोणालाही विषद करून सांगण्याची जरूरी नाहीं. आमच्या मतें सुधारणावाद्यांनी प्रायश्चित घेणें जसे

† ही घटना ता. ९ जून १९२७ रोजी घडली.