व्यक्तीला जरूर ते स्वातंत्र्य . . . . , सारखेच अनिष्ट होतात १९७
निंद्य आहे, तसेंच भागवत् धर्मीयांनीहि सहभोजनाकारणें प्रायश्चित घेणें निंद्य आहे. कारण भागवतधर्माला कांहीं भेदभावच नाहीं. इतकेंच नव्हे तर काला हा भागवतधर्माचे मुख्य अंग आहे. रा. वाकसकर यांच्याबरोबर झालेलें पांगारकरांचे सहभोजन हा तरी कालाच होता. मग भागवतधर्मी पांगारकरांना त्याबद्दल प्रायश्चित्त घेण्याचें काय कारण होतें, हें आम्हांस कळत नाहीं. आतां रा. पांगारकर हे कर्मठ आहेत असें धरून जरी चाललें तरी त्यांचें वर्तन प्रामाणिकपणाचें आहे असें म्हणणें शक्य नाहीं. रा. पांगारकर असें म्हणतात कीं
आपण गेलों तें फराळाचें आमंत्रण होतें म्हणून गेलों. फराळासाठीं निर्लेपाचे
पदार्थ असतात. आणि परजातीच्या हातच्या निर्लपाच्या वस्तु सेवन करण्यांत अधर्म होत नाहीं असे रा. पांगारकरांचे म्हणणें आहे. परंतु ह्या दोन्ही म्हणण्यांत कांहीं अर्थ आहे असें आम्हांस वाटत नाहीं. निर्लेपाचे पदार्थ केव्हां व कधी खावे या संबंधीचा शास्त्राधार अगदी उघडा आहे. ब्राह्मण पुरुषास स्नान केल्याशिवाय भोजन करणें निषिद्ध आहे. परंतु स्नान वगैरे wef उरकण्यास वेळ लागल्यास भोजनाच्या रमण्यांत रममाण होणाऱ्या ब्रह्मवृंदांची उपासमार होऊ नये म्हणून पाण्यांत न शिजविलेले पदार्थ-त्यालाच निर्लेपाचे पदार्थ असें म्हणतात-स्नानापूर्वी खाण्याची मुभा शास्त्राने त्यांना ठेविली आहे. याचा अर्थ असा AS कीं अब्राह्मणजातीच्या घरचे निर्लेपाचे पदार्थ ब्राह्मणाने खुशाल खावेत. आतां प॑रजातीच्या हातचे निर्लेपाचे पदार्थ खाणें निषिद्ध नाहीं असें जें पांगारकरांचे मत आहे तें खरें आहे, असें जरी धरलें तरी फराळ म्हणजे निर्लेपाचे पदार्थ हें पांगारकरांस कसें वाटलें हें मोठेच नवल आहे. कारण ब्राह्मणजातीत संध्याकाळच्या जेवणाला सर्वत्र फराळ हाच शब्द लावतात. हे सर्वश्रुत आहे. असे असताना पांगारकरांना फराळ या शब्दाचा गूढ अर्थ कळला नाहीं हें असंभवनीय आहे. फराळ शब्दाच्या गूढ अर्थांकडे त्यांनीं लक्ष दिलें असतें तर त्यांना ही चूक टाळतां आली असती. असो न जावें.पण गेले! आता गेल्यावर तरी आपणांपुढें पात्रावर काय वाढलें आहे हें पाहून मग ग्रहण करावयाचें होतें. जेवणांत वरणभात, श्रीखंड, पुऱ्या, इत्यादि पदार्थ वाढले होते असें रा. जोशी यांनी आपल्या पत्रांत जाहीर केलें आहे. अर्थात् आपली फसवणूक झाली असें पांगारकर जर म्हणतात तर निर्लेपाच्या पदार्थाऐवजी दुसरेच पदार्थ पात्रांत आलेले पाहून पांगारकर पंक्तीतून उठून जावयाचे होते. तसे जर त्यांनीं केलें असतें तर त्यांना प्रायश्चित्त घेण्याची पाळी आली नसती व त्यांचा प्रामाणिकपणाहि व्यक्त झाला असता. पण कायस्थाच्या घरीं गेल्यावर पात्रावर वरणभात आला असतां जो ब्राह्मण गृहस्थ यथेच्छ भुरके मारतो त्यांनें, तुम्ही असें कां केलें ? अशी पृच्छा केली असतां आपली फसगत झाली असें म्हणतो, त्याच्या