१९८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सोदेगिरीला सीमा राहिली नाहीं, असें म्हणणें प्राप्त आहे. एक तर पांगारकरांनी वाकसकरांकडे जेवावयास जावयाचे नव्हतें, व गेलेच तर ते निभवून दाखवावयाचें होतें. पण नीतिमत्तेचा मक्ता घेतलेल्या या ब्राह्मणांना अप्रामाणिक युक्तिवाद करण्याची इतकी घाणेरडी संवय जडलेली असतें कीं, आम्हाला केव्हां केव्हां त्याचा मोठा किळस येतो. हा सर्व प्रकार वाचून आमची अशी समजूत झाली आहे की, रा. पांगारकर व वाकसकर यांचा मोठा घरोबा असावा ; व पांगारकरांनी वाकसकराकडे जेवल्याचे यापूर्वी अनेक प्रसंग येऊन गेलेले असावेत. रा. जोशी यांनी जर ही जेवणाची बातमी फोडली नसती तर या स्वारीनें ज्याप्रमाणे यापूर्वी वाकसकरांचे अन्न खावून साफ पचवून टाकलें तसें या प्रसंगीहि केलें असतें, व प्रायश्चित्ताचा प्रसंग टाळला असता. पण जोशांनी रमजान महिन्यांतील फकिराप्रमाणे पांगारकरांची गत करून सोडली. तेव्हां “मैं करता हूं, ओ खुदा देखता è असें प्रत्यक्ष सिद्ध झाल्यावर या स्वारीला शेण खाण्याशिवाय गत्यंतर उरलें नाही. एरवी प्रायाश्चित्ताची त्यांना फारशी दिक्कत होती असे दिसत नाही.
रा. पांगारकरांवर जो प्रसंग आला तो आत्मिक बल व मनोधैर्य नसल्यामुळे आला. पुष्कळच थोड्या ब्राह्मण लोकांत मनोधैर्य असतें. तेव्हा तें रा. पांगारकरांत नसलें तर त्यांत त्यांचा विशेष दोष आहे असें म्हणवत नाही. यास्तव पुण्याच्या कांही ब्राह्मण लोकांनी एक नवें उपहार गृह उघडण्याचे जें मनोधैर्य दाखविलें आहे, ते पाहून आम्हास आनंद वाटल्याखेरीज राहत नाहीं. या उपहारगृहासंबंधी माहिती देतांना ता. ७ जून १९२७ च्या मुंबईच्या टाईम्स पत्राच्या पुण्याच्या बातमीदारानें असें कळविलें आहे कीं, या भावी उपहारगृहांत बकऱ्या कोंबड्यांचे मांस व अंडी वगैरे पदार्थ विक्रीस ठेवण्यांत येणार आहेत. हें नवें उपहारगृह काढण्याचा हेतू या बातमीदाराच्या माहितीप्रमाणे असा आहे कीं, ब्राह्मण जातींतील रोग्यांस डॉक्टरकडून कोंबड्या बकऱ्यांच्या मांसाचे खाद्य नियोजित केलें जातें, तेव्हां घरच्या भानगडींमुळे रोग्यांची मोठीच हरकत होऊन रोगी दगावण्याचा मोठा संभव असतो. ही हरकत पार पडावी म्हणून हें नवें उपहारगृह उघडण्यांत येणार आहे. या बातमीदारानें असेंहि कळविले आहे कीं, सदरहू उपहारगृहास चांगला आश्रय मिळाल्यास त्यांत पुढें उत्तम प्रकारची arate विक्रीस ठेवण्यांत येणार आहे. ज्या ब्राह्मण गृहस्थांनी ही योजना रूजूं घातली आहे, त्यांचा हा उद्योग स्तुत्य आहे असें आम्हांस वाटतें. एक तर ब्राह्मण जात अगदींच छोटी. त्यांत ती म्हणजे हिंदु धर्माचा प्राण. ती जर एखाद्या साथींत सांपडली आणि मासाहारानें जगेल असे डॉक्टरनें सांगितले तर कोणीहि कोंबडें-बकरेंच काय पण आपला रेडा मारूनहि ब्राह्मण रोग्याचा जीव जगवील. परंतु अब्राह्मणाच्या हातचें ब्राह्मण जातीस खातां येत नसल्यामुळे त्या जातींना या बाबतीत ब्राह्मण जातीची सेवा करण्याचा लाभ घेतां येत नाही. ही