४५
ब्राह्मणबंधुंनी परकीयांचें नाही तर नाही पण
स्वकीयांचे तरी ऐकावे
चोरटा व्यवहार करण्याची संवय येवढाच दोष आजच्या ब्राह्मणवर्गात आहे असों मात्र कोणी समजूं नये. व ज्यांनी श्री. सरलादेवी चौधराणी यांनी दक्षिण हैदराबाद येथें भरलेल्या सहाव्या सामाजिक परीषदेच्या अध्यक्षपदावरून जें मोकळ्या मनानें भाषण केलें तें वाचून तर कोणासच तसें वाटणार नाहीं. श्री. सरलादेवी चौधराणी यांनी आपल्या भाषणांत असें सांगितले की, “मी ब्राह्मण कुलांत जन्म घेतला म्हणून माझ्या वाडवडलांना दोष देणें जरी मला उचित नसलें तरी सध्याच्या हिंदु समाजाला लागलेली उतरती कळा पाहिली म्हणजे समाजाची काळजी वाहून समाजसुधारणा करण्याचें आपलें कर्तव्य पाळण्यास ब्राह्मण विसरले याबद्दल मात्र सर्व ब्राह्मणांना दोष दिल्याशिवाय मी राहणार नाही .. .... प्रचलित ब्राह्मण जातीतील स्त्री पुरुषांस शारीरिक स्वच्छता किंवा बुद्धीचा विकास यातच ब्राह्मण्य आहे अशी जी खोटी शिकवण दिली जाते, तिच्या ऐवजी ब्राह्मण्य म्हणजे अस्वच्छाला प्रेमेंकरून जवळ करण्याची सदयता, अपवित्राला पवित्र करण्याची उत्कंठा, असंस्कृताला सुसंस्कृत करून त्याला मनानें, बुद्धीने आपलेसारखा करण्याचा उद्योग अशी शिकवण देणें अवश्य आहे. समाजात चालना देण्याचें जें ब्राह्मणांचे कर्तव्य तें ब्राह्मण वर्गाच्या हातून होत नाही. हिंदुस्थानांतील मुळच्या रहिवाशांवर आर्य संस्कृतीचे आवरण घालून ज्या अगस्ति ऋषीने त्यांना आर्य बनविले त्या अगस्तीचा शुद्धीकरणाचा धडा गिरविण्यास ब्राह्मण लोक विसरले आहेत. आपला अवतार कशाकरतां आहे याची ब्राह्मणवर्गास अजीबाद भुल पडली आहे. इतकी की, बहुजन समाजात ज्ञानप्रसार करून त्यास सुशिक्षित करणें हा त्यांचा मुख्य धर्म असतां जे कोणी ब्राह्मण खालच्या वर्गाशी मिळून मिसळून वागतात त्यांची धर्मकार्य करतात व त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर ब्राह्मणवर्गाकडून बहिष्कार घालण्यांत येतो व त्यांचा अन्य तर्हेनें छळ होतो ! हा ब्राह्मणवर्गाच्या इतिकर्तव्यतेंत केवढा मोठा विपरीत फरक घडून आला आहे ! खरें म्हटले असतां एकाद्या ब्राह्मणानें जर बहुजन समाजातील एकाद्या व्यक्तीस अगर वर्गास शिक्षण देण्याचें अगर त्यांचें धर्मकार्य करण्याचें नाकारलें तर तो अधर्मी म्हणून त्याला दोषी ठरविणें योग्य होईल. अरेरे ! आज