ब्राह्मण बंधुंनी परकीयांचे नाही तर नाहीं पण स्वकीयांचें तरी ऐकावे. - Page 245

ब्राह्मणबंधुंनी परकीयांचें नाही तर नाहीं पण स्वकीयांचे तरी ऐकावे २०१

ब्राह्मणांचा जितका अधःपात झाला आहे तितका अधःपात एकाद्या अंत्यजाचा देखील झालेला नाही. शहाणपणा, दुरदर्शीपणा, निष्काम कर्म, इत्यादि गुणास ब्राह्मणवर्ग इतका पारखा झाला आहे कीं सामाजिक सुधारणा घडवून आणणाऱ्या लोकांनीं प्रथमत: ब्राह्मण जातीची सुधारणा करण्याकरितां एक मंडळ प्रस्थापित करणें अत्यावश्यक आहे. ब्राह्मण जातीची अधोगति इतकी झाली आहे. कीं त्यांचें पुनर्जीवन करण्याची जितकी जरूरी आहे तितकी जरूरी इतर कोणत्याहि जातीस नाहीं असें म्हणणें सर्वस्वी यथार्थ होईल. हिंदु समाजाच्या सारेगम स्वरामधल्या “सा' ची जागा ब्राह्मण वर्गाची आहे. ही 'सा' ची किल्ली जर बिघडली तर सारा रागच बिघेडल हें उघड आहे. ह्या किल्लीचा सूर आधीं ताळ्यावर आणला पाहिजे व तो आणण्यास ब्राह्मणवर्गास त्याची अधोगतीची व कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे. ज्याची दृष्टी व्यापक आहे, ज्याच्या मनांत समाजांतील सर्व व्यक्तींविषयीं सारखें प्रेम नांदत आहे आणि ज्याच्या धर्मशास्त्रांत सर्वांच्या उन्नतीला सारखा वाव ठेवण्यांत आला आहे असाच माणूस धर्माधिकारी होण्यास पात्र आहे. ब्राह्मणपद हें जन्मप्राप्त आहे, तें जन्माव्यतिरिक्त कोणास प्राप्त होऊं नये हा निर्बंध दूर करणे अवश्य आहे. ब्राह्मणपद हें तपाचें फळ आहे, हा पुरातन कालचा नियमच पुन्हां अमलांत आणणें अवश्य आहे. ब्राह्मण आईबापांच्या पोटीं जन्मला ब जो अब्राह्मणांचे धंदे करतो तो जरी ब्राह्मण म्हणाला तरी त्याची ब्राह्मणेतरांत गणना झाली पाहिजे. धनाचा लोभ सोडून परोपकारार्थ देह झिजविणें हा ब्राह्मणांचा खरा धर्म आहे. परंतु तो धर्म सोडून जो ब्राह्मण धनाचा अगर AGT उपासक झाला असेल त्या ब्राह्मणाने आपलें ब्रा्मणपद सोडून ब्राह्मणधर्म आचरणाऱ्या वैश्याला अगर शुद्राला तें मोकळे करून दिलें पाहिजे. चालू मन्वंतरांत धंद्यांच्या आधारावर समाजाचें वर्गीकरण करणें अवश्य आहे व ज्यांची वृत्ति समाजसेवेची आहे अशाच लोकांना ब्राह्मण हें नामाभिधान

देऊन बाकींच्यापासून तें हिसकावून घेतलें पाहिजे.” आम्ही आज इतके दिवस

ब्राह्मणवर्गासंबंधी जें लिहित होतो तें श्री. सरलादेवी यांनी इतक्या उत्तम तर्‍हेनें आणि स्पष्ट शब्दांत सांगितले याबद्दल आम्हांस आनंद वाटतो. आमच्या ब्राह्मणबंधूस परकीयांचे नाहीं तर नाहीं पण स्वकीयांचे तरी ऐका येवढेंच आम्ही

सांगतों.

आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत, ता. १५ जुलै १९२७.