४६
संकुचित ध्येय स्त्रीवर्गापुढें ठेवणे
अनुदारपणाचे द्योतक
हिंदु लोकांत स्त्री म्हणजे एक पुरुषाच्या चैनीची वस्तु आहे असां सर्वसाधारण समज आहे. आणि पुरुषांच्या इच्छेनुसार स्त्रियांनी वागावें अशी सर्वांची समजूत असते. स्त्री म्हणजे चैनीची वस्तु समजली गेल्यामुळें तिच्या शरीराला वस्त्रप्रावरणांनीं व दागदागिन्यांनी शुंगारण्यांत बऱ्याच धनाचा व प्रेमाचा व्यय होतो हें खरें. तथापि माणूस समजून तिला कोणत्याच प्रकारचे हक्क हिंदु धर्मांत देण्यांत आलेले नाहींत. जड जिवाची जोपासना करण्यास संपत्तीचा वारसा तिला नाहीं तो नाहींच. पण शिक्षण घेऊन मन सुसंस्कृत करण्याचा अधिकारहि तिला नाहीं. आमच्या शास्त्रांत गाईला आत्मा आहे असें सांगून खिस्ती लोकांना लाजवूं पाहाणारें हिंदु लोक स्त्रीला आत्मा आहे असें जरी मानीत असले तरी कृतीने तसें दाखवित नव्हते हें खरे. आतां कोठें त्यांना हें उमगत आहे, परंतु त्यांतहि त्यांचें ध्येय मोठेंसें उच्च नाहीं. स्त्रियांनी गृहलक्ष्मी तेवढें व्हावें ! त्याच्या पुढें स्त्रियांच्या प्रगतीची मजल जाऊ नये | ही मर्यादा अबला-उन्नति प्रीत्यर्थ झटणाऱ्या बऱ्याच सुधारकांनी आपल्यापुढें ठेविल्याचें दृष्टोत्पत्तीस येतें. आमच्या मतें अशा प्रकारचें संकुचित ध्येय स्त्रीवर्गापुढें ठेवणें अनुदारपणाचें द्योतक आहे. दरेक व्यक्तिमात्राला पूर्णावस्थस जाण्यास समाजानें अवसर दिला पाहिजे हें तत्त्व जर एकदां मान्य झालें तर मग स््त्रयांच्यापुढें असलें हलकें ध्येय ठेवण्यांत यावें याचें आम्हांस नवल वाटतें. एका इंग्लिश तत्त्ववेत्त्यानें असें सांगितले आहे कीं, ध्येयप्राप्ति न होणें हा कांही गुन्हा नाहीं ; पण कमी प्रतीचे ध्येय डोळ्यापुढें ठेवणें हा मात्र मोठाच गुन्हा आहे. या न्यायानें पाहतां सर शंकर नायर यांनीं ता. १७ जून रोजी पुणें येथील हिंदी महिलापीठाच्या पदवीदानसमारंभाचे वेळीं विद्यार्थीनींना जे चार उपदेशाचे शब्द सांगितले ते फार महत्त्वाचे होते. सर शंकर नायर यांच्या उपदेशांतील महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या हिंदी स्त्रियांनी देखील त्यांच्या अमेरिकन, चिनी, टर्की, रशियन वगैरे भगिनींप्रमाणे स्वातंत्र्याविषयीं चळवळ करून पुरुषांच्या बरोबरीचे sap मिळवावे हा होता. उपरिनिर्दिष्ट देशांतील स्त्रीपुरुषांमध्ये ज्या भांडाभांडी सध्या चालू आहेत, त्यांचा आधार देऊन, तिकडील स्त्रियांचा आदर्श जशाचा तसा आपल्या स्त्रियांच्या पुढें ठेवणें अविचारांचे