संकुचित ध्येय स्त्रीवर्गापुढें ठेवणें अनुदारपणाचे द्योतक २०३
होईल असें कांही विचारी माणसांस वाटणें शक्य आहे. कारण त्यांच्या मतें नोकऱ्यांमध्ये, धंद्यांमध्ये तिकडील स्त्रीपुरुषांत जी सध्या स्पर्धा चालूं आहे तिचे अनिष्ट परिणाम आपण ढळढळित पाहात असतां तशा प्रकारच्या चळवळी इकडे सुरू करा म्हणणें इष्ट नाहीं. या त्यांच्या म्हणण्यांत कांहीं तथ्यांश आहे असें आम्हांस वाटत नाही. पुरुषांपुरुषांत सर्वत्र स्पर्धा चालू आहे. तशी ती हिंदुस्तानांतहि चालू आहे. अशी स्पर्धा चालू नये म्हणून तर वर्णाश्रम धर्माची कल्पना अस्तित्वांत आली, अशी आमची ठाम समजूत आहे. ब्राह्मणाच्या पदाची अभिलाषा धरून क्षत्रियांनीं त्यांच्यावर मात करूं नये, क्षत्रिय होण्याची महत्वाकांक्षा धरून वैश्यांनीं व शूद्रांनीं त्यांच्याशीं झगडा करूं नये, व अतिशूद्रांनीं तर देतील त्यावर आपलें कार्य भागवावें, एकमेकांच्या पदाला एकमेकांकडून ढका लागूं नये व ज्याचे त्याचें पद अचल व अढळ रहावें हाच वर्णाश्रम धर्मांचा मुख्य हेतु आंहे. पण आजकाल विशिष्ट जातीची विशिष्ट प्रकारची मक्तेगिरी लयास जाऊन ब्राह्मण लोक हाडें नाहींतर जोडे विकण्याचा धंदा राजरोसपणें करून सर्वात खालचे असे जे अतिशुद्र त्यांच्याशी स्पर्धा करीत आहेत. क्षत्रिय लोक
आपली मर्यादा सोडून पुरोहितपणा आपणांस प्राप्त व्हावा म्हणून ब्राह्मणांशीं हेवा
देवा करीत आहेत. तसेंच अतिशूद्र लोकहि धर्माने घालून दिलेली मर्यादा उल्लंघून प्रोफेसरी, डॉक्टरी, वकीली वगैरे करून त्रैवर्णिकांच्या तोंडचा घांस आपल्याकडे ओढून घेत आहेत. पुरुषापुरुषांत हा लढा चालला असतां व कांहीं ठिकाणीं तो विकोपासहि गेला असतां तो थांबवा व एकमेकांना एकमेकांची बरोबरी करूं नका असा उपदेश Heald आमच्या कानांवर नाहीं. हा लढा जर चालतो व त्यापासून अनिष्ट परिणाम होण्याचें कोणासही भय वाटत नाहीं तर त्या लढ्यांत स्त्रियांचा असा एक नवा प्रतिपक्ष उभा राहिला तर राष्ट्र रसातळास जाईल असे कां वाटावें कोण जाणें. अशा लढ्यांतून योग्य माणूस स्त्री अगर पुरूष योग्य जागीं येऊन राष्ट्राचा अभ्युदय होईल हेंच खरें आहे. सर शंकर यांनी स्त्रीशिक्षणाच्या बाबतींत दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, तो असा कीं, युरोप, अमेरिका, रशिया, चीन, इत्यादि देशांत स्त्रियांसाठी निराळीं विद्यापीठे, शाळा व कॉलेजें कमी होऊं लागलीं आहेत तेव्हां हिंदुस्थानातहि स्त्रियांच्या शिक्षणासाठी निराळ्या शाळा, निराळीं कॉलेजें नकोत. स्त्रियांचे शिक्षण पुरूषांच्या बरोबर एकत्र असलें पाहिजे. स््त्रयांचें व पुरुषांचे शिक्षण एकत्र होऊ नये याला आधार देतांना पुराणमतवादी लोक असें सांगतात कीं, स्त्रियांचा विनय आणि पुरुषांची