२०४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
नीतिमत्ता शाबूत राखण्यासाठीं वयाच्या ७ वर्षांनंतर त्यांना वेगवेगळें शिक्षण देण्यांत यावें. ७ व्या वर्षांनंतर शारीरिक व मानसिक स्थितीमध्यें पालट होऊं लागतो, म्हणून अशा वेळीं मुलामुलींना वेगळें ठेवणें अवश्य आहे. वेगवेगळे ठेवून नीतिमत्तेचा परिपोष करण्याचा हा प्रकार आम्हास तरी मोठा विलक्षण दिसतो. एखाद्या तरुणास निर्जन वनांत, हिमालयासारख्या पर्वताच्या आसमंतात जर डांबून ठेविलें तर तो आजन्म ब्रह्मचारी राहील याबद्दल कांहीं वानवा नाहीं. त्याचप्रमाणे एखाद्या नवयौवन स्त्रीस तुरुंगाच्या आंत कोंडून ठेविलें व तिला कोणाचा संसर्ग होऊ दिला नाहीं, तर ती देखील आजन्म साध्वी होऊं शकेल. पण अशांच्या नीतिमत्तेची कवडी इतकीहि किंमत आहे, असें आम्हास वाटत नाहीं. स्त्रियांच्या सहवासांत राहून जो पुरुष आपलें मन ताब्यांत ठेवूं शकतो व पुरुषांच्या सहवासांत राहून जी स्त्री आपलें पाऊल वांकडे पडणार नाहीं अशी खबरदारी घेऊ शकते, त्यांनाच आमच्या मतें नीतिमान् म्हणतां येईल. आतां वेगळें ठेवण्यानें जर नीतिमत्तेचा परिपोष होतो, हें जर खरें असेल, तर त्यांचें प्रत्यंतर मुसलमान पुरुषांच्या वर्तनात आपणांस दिसलें पाहिजे. कारण मुसलमान समाजात स्त्रीपुरुषांमध्ये गोषापद्धतीमुळें स्नेहभावाचें पाणी इतकें दुभंग झालें आहे की, आईला मुलाचें व बहिणीला ward तोंड पहाणें अशक्य जातें. परंतु वास्तविक प्रकार किती उलट आहे हें कोणास सांगावयास नको. हिंदू लोकापेक्षां मुसलमान लोकांत स्त्रियांविषयीं अगदी हलक्या प्रतीच्या मनोभावना वास करीत असतात, ही गोष्ट सर्वांच्याच अनुभवाची आहे. आतां मुसलमान लोकांतच स्त्रियांविषयी अनुदार बुद्धि विशेष प्रमाणांत जागृत असावी व हिंदूंत ती नसावी याचें कारण शोधून पाहिलें असतां असें दिसून येईल की मुसलमान लोकांत हिंदूइतका स्त्रीपुरुषांचा मिलाफही नाहीं. तसा जर होता तर त्यांच्यांत असल्या हलक्या प्रतीच्या भावना जागृत होत्याच ना. परंतु ही गोष्ट अंगी बाणावयास उभयपक्षांचा सहवास होणें अत्यंत जरूर आहे. जेथें जेथें अशा प्रकारचा सहवास घडत नाही तेथें तेथें स्त्रियांविषयी पुरूषांच्या मनांत अनुदार भावना जागृत असणें अगदी सहाजिक आहे. कारण जी गोष्ट दुर्मिळ, दुष्प्राप्य व दुःसाध्य असते ती आपल्या झपाट्यांत आल्याबरोबर तिच्यावर चवताळून जाणे हा मनाचा धर्म आहे. त्याविरुद्ध क्वचितच कोणास जातां येईल. उलट तीच गोष्ट नेहमींच्या परिचयाची असेल तर ती आपल्या सांनिध्यांत जरी आली तरी तिच्याबद्दल मन विशेषसें अधीर होत नाहीं. स्त्रीपुरुषांची नीतिमत्ता जर