संकुचित ध्येय स्त्रीवर्गापुढें ठेवणें अनुदारपणाचे द्योतक २०५
वाढवावयाची असेल तरं त्यांचा सहवास जितका जास्त होईल तितका अवश्य घडवून आणला पाहिजे. पृथक् पृथक् ठेंवल्यानें अनीतीचा अग्नी शांत न होतां जास्त भडकणार आहे, हें कोणीहि विसरूं नये. अशा दृष्टीनें पहातां सर शंकर नायर यांनीं एकत्र शिक्षणाचा जो उपदेश केला तो नीतिमत्तेला पोषकच आहे, असें म्हणणे प्राप्त आहे.
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. १५ जुलै १९२७.