स्वाभिमान म्हणजे परापमान नव्हे - Page 250

४७
स्वाभिमान म्हणजे परापमान नव्हे

गेल्या अंकांत आम्ही मुंबई येथें फणसवाडींत नवीन स्थापन झालेल्या प्रतिवादी भयंकर मठ नांवाच्या देवळांत कसे गेलों याची सविस्तर हकीकत दिली होती. आतां केसरीच्या गेल्या दोन अंकांत या मठाकडून त्या बाबतींत खुलासा प्रसिद्ध झाला आहे. त्यांत मठाधिपतींनीं आपण आंबेडकरांना बोलावलेंच नाहीं असें खोटेच जाहीर केलें नाहीं, हे आम्ही आपलें नशीब समजतो. भेटीस या म्हणून आपण कळविलें होतें हें त्यांनी प्रांजलपणें कबूल केलें ही त्यांची थोरवी म्हणावयाची. आतां “टेलिफोन मधून आम्ही कोणासहि या असें कळविलें नव्हतें” असें जें मठाधिपतीनें जाहिर केलें आहे त्यांत मठाधिपतीनें स्वतः या, असा टेलिफोन केला नाहीं, असें म्हणण्याचा हेतू असेल, तर तें खरें आहे. ज्या गृहस्थानें आमचा कार्ड नेला, त्यानेच आम्हाला टेलिफोन केला हेंच आमचें म्हणणें आहे. मठाधिपतीनें केला असें आम्ही केव्हांच म्हणालों नव्हतो. मठाधिपतीनें

आपण टेलिफोन केला नाहीं असें जें लिहिलें तें केवळ कर्मठ लोक आपल्यावर

उदारपणाचा आरोप करतील या भयास्तव लिहिलें आहे तेव्हां त्यांत विशेष महत्त्व नाहीं. महत्व मात्र दोन गोष्टींना आहे. आंबेडकर अस्पृश्य आहेत हें मागाहून कळलें ; तें अगोदर कळलें असतें तर त्यांना परवानगी देण्यांत आली नसती असे मठाधिपतीचें म्हणणें आहे. यावर मठाधिपतींना आमचा असा प्रश्न आहे कीं. अस्पृश्यांना देवळांत प्रवेश होऊ दिल्यानें जर देऊळ Ted तर कोणता माणूस अस्पृश्य आहे व कोणता नाहीं हें आगाऊ ओळखण्याचे कांहीतरी अचूक साधन शोधून काढणें धर्मसंरक्षणाच्या दृष्टीनें अत्यंत महत्त्वाचें आहे. कारण एकादा अस्पृश्य माणूस आपण अस्पृश्य आहोंत असें सांगावयास कबूल झाला नाहीं किवा तो अस्पृश्य आहे याचें बिग कोणा उपद्व्यापी ब्राह्मण्यग्रस्तानें जर फोडलें नाहीं तर तो खुशाल देवळांत रिता शिरून देवाला भेटूनच काय पण स्वामीच्या उरावर लाथ मारूनहि भरला बाहेर निघेल व देऊळ बाटलें असें स्वामीस कळूनहि येणार नाहीं. असले प्रकार हजारों घडत असतील ; व दुसरीकडे जें एक पत्र t छापलें आहे त्यावरून असें घडत असावें असें दिसतें. नकळत आलेला अस्पृश्य देऊळ भ्रष्ट करीत नाहीं, पण सांगून सवरून आलेला अस्पृश्य मात्र भ्रष्टाकारास

† पाहा, परिशिष्ट-१८.