स्वाभिमान म्हणजे परापमान नव्हे - Page 251

स्वाभिमान म्हणजे परापमान नव्हे २०७

कारणीभूत होऊं शकतो ही विचारसरणी तर आम्हाला अगदींच नादानपणाची दिसते. धर्म खरोखरींच जर पाळावयाचा असेल तर मग अस्पृश्य कोगत्याहि स्वरूपात आत न येईल अशी व्यवस्था मठाधिपतीनीं अवश्य करून घ्यावयास पाहिजे. मागें पेशवाईत अस्पृश्य कोण हें ताबडतोब ओळखतां यावें म्हणून अस्पृश्यांच्या गळ्यांत काळा दोरा बांधण्याची सक्ती करण्यांत येत असे. हें काळें जानवें अस्पृश्यांच्या गळ्यांत पुन्हा अडकविण्यास इंग्रज सरकारकडून सक्ती करण्यांत यावी असा जर विनंति अर्ज मठाधिपतीने केला व त्यांत यश आलें तर त्यांना अस्पृश्यांच्या अतिक्रमणापासून हिंदुधर्माचें संरक्षण केल्याचें पुण्य लाभेल

आणि अखिल हिंदु जनता त्यांना दुवा देईल. वारंवार देऊळ धूत बसण्याचा

बायकीपणा करण्यापेक्षां अशाप्रकारें कायमचा कांटा काढणें हेंच खऱ्या मुत्सुद्देगिरीचें व पुरुषपणाचें लक्षण आहे असें आम्हास वाटतें. तरी मठाधिपतीनें इकडे अवश्य लक्ष द्यावे. दुसरें असें कीं आंबेडकरांच्या प्रवेशाने भ्रष्ट झालेलें देऊळ आपण शुद्ध केलें आहे, असा शंखनाद मठाधिपतीनें चालविला आहे. सनातनधर्मी लोकांची समजूत करण्याच्या इराद्याने देवळाचें शुद्धीकरण झालें हें योग्यच आहे असें मठाधिपतीस वाटणें साहजीक आहे. परंतु या शुद्धीकरणाचा अस्पृश्य जनतेच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार मठाधिपतींने केला असावा असें दिसत नाहीं. हिंदु समाज हा वर्णाश्रमी समाज आहे. या वर्णाश्रमाच्या योगें खोट्या वर्णाविमानाचें प्रस्थ जिकडे तिकडें माजलेलें आपल्या दृष्टीस पडतें. आपण कितीहि मूर्ख असलों तरी श्रेष्ठवर्णातील कोणालाच त्याचें कांहीं वाटत नाहीं; व मूर्खाचें शहाणे होण्याचा देखील कोणी विशेषसा प्रयत्न करीत नाही. जन्मामुळे wid जातिविशिष्ट श्रेष्ठत्व मानलें जात आहे त्यांनीं तरी गुण अगर कर्मविशिष्ट खरें खुरें श्रेष्ठत्व संपादन करण्याची यातायात कां करावी ? उलट कनिष्ठ वर्णाचे जे लोक आहेत त्यांच्या मध्यें मात्र जागृति झाल्या दिवसापासून गुण अगर कर्मविशिष्ट खरें BX श्रेष्ठत्व संपादन करण्याचे प्रयत्न जारीनें चालू आहेत. अस्पृश्य वर्ग अशा जागृत अवस्थेत आला असतांना वर्णाभिमान्यांनीं त्यांची मनें न दुखवतील अशा बेतानें आपल्या वर्णाभिमानाला योग्य ती मर्यादा घालणें अवश्य आहे. कोणीहि आपला स्वाभिमान, कुलाभिमान, जात्यभिमान हवा तर धरावा. पण स्वाभिमान म्हणजे परापमान नव्हे ही गोष्ट क्षणभरहि विसरूं नये. आपण जातीनें अलग आहोंत असें कोणी हवें त्यानें समजावें. पण इतर जातीपेक्षां आपण श्रेष्ठ आहोंत असे समजून आपला श्रेष्ठपणा इतर जातीस भासवून त्यांचीं मनें दुखवूं नयेत. नाहींतर दुखावलेला सर्प जसा दंश करण्यास विसरत नाहीं तसा दुखावलेला माणूस सूड घेण्यास विसरणार नाही. देवळाची शुद्धी करून मठाधिपतीनें सर्व अस्पृश्य जनतेचा