स्वाभिमान म्हणजे परापमान नव्हे - Page 252

२०८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

भयंकर अपमान करून त्यांची मने क्षुब्ध केली आहेत. पदोपदी अपमान झाल्याचा काय परिणाम होतो हे आम्हीं सांगण्याचे कारण नाहीं. आज जे लोक राजकारणांत जहाल आहेत ते जहाल होण्याचें कारण पूर्वी कधी कोणा युरोपियनानें त्यांचा अपमान केला असावा हेंच होय. याची साक्ष आमच्याशिवाय दुसरे पुष्कळहि देऊ शकतील. युरोपियन गृहस्थाने स्पृश्य गृहस्थाचा अपमान केला तर तो जहाल होतो. असे म्हणणारांनी जर स्पृश्यानें अस्पृश्याचा अपमान केला तर तो पाया पडेल असें मानून आपली भूल करून घेऊ नये. अशा अपमानाने स्पृश्य अस्पृश्यांत मारामारी, खुनाखुनी झाली नाही तर मिळविली असेंच म्हणावें लागेल.

PRIS त म NS ORR SPOS ONC NRE SIN आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत, ता. १५ जुलै १९२७.