४८
बिचार्या बावळट जाती ब्राह्मण्याच्या उपासक
असल्यामुळे खुळ्या धर्मसमजुतीनें आपल्या
अर्थास आंचवल्या
मागे एकदां नागपुरांत कॉलेजांत शिकत असलेल्या एका महार विद्यार्थ्याने कॉलेजमध्यें येऊन प्रिन्सिपाल जवळ घरीं जाण्यास रजा मागितली ; व सांगितलें कीं ब्राह्मणांशीं आमचें भांडण झालें आहे. एकाद्या ब्राह्मणाचा जरी खून करूं शकलों तरी माझ्या जन्माचें सार्थक झालें असें मी समजेन. दुखावलेला अस्पृश्य तरुण कोणत्या थराला जातो याचा हा दाखला आहे. त्यांतल्या त्यांत दुखावलेला तरुण अस्पृश्य जर सुशिक्षित असला तर त्याच्या मनांत काय येतें हें वरील उदाहरणावरून सिद्ध होत आहे. लाहोर येथील एका चांभार जातीच्या मुलाचा अशाच प्रकारचा अपमान झाला व त्याच्याहि मनांत वरील महार विद्यार्थ्याच्या मनांत आलेले विचार आले असल्यास नवल नाहीं. पण त्याच्या क्रोधाग्नीवर लवकरच सामदंडाचें पाणी पडल्यामुळें तो शांत झाला ही आनंदाची गोष्ट आहे. हा चांभार विद्यार्थी गेल्या जून महिन्यांत मॅँट्रिक्युलेशनची परीक्षा एस झाला व पुढील अभ्यासाकरिता लाहोर येथील दयानंद कॉलेजांत त्यानें आपलें नांव दाखल केलें. काहीं कारणामुळें सदरहु कॉलेजला जोडून असलेल्या विद्यार्थ्यीवसतिगृहांत त्याला राहणें भाग झालें. परंतु सदरहु वसतिगृहांतील शंभर स्वयंपाक्यांनी चांभार मुलास आपण वाढणार नाहीं व त्याचें उष्टे काढणार नाहीं अशी तक्रार केली. सदरहु कॉलेज आर्य समाजाचें आहे व आर्यसमाज जातिभेदजन्य उच्चनीय भाव बाळगीत नाहीं वगैरे प्रकारची शिकवणूक या बिथरलेल्या ब्राह्मण्यग्रस्त स्वयंपाक्यांना कॉलेजच्या प्रिन्सिपालने देऊन पाहिली. पण कांहीं केल्या स्वयंपाक्यांच्या डोक्यांत प्रकाश पडेना. तेव्हां त्यांनीं संप केला व चांभार मुलाला काढा नाहींतर आम्हीं काम सोडून जाऊ अशी धमकी प्रिन्सिपाल साहेबांस दिली. अशा प्रकारे पवित्र्यावर आलेल्या स्वयंपाक्यांचा प्रश्न वसतिगृहाच्या कमीटीकडे सोपविण्यांत आला. व कमिटीने स्वयंपाक्यांनाच कामावरून कमी करावें असा फैसला दिला. या निकालाबद्दल कॉलेजच्या तत्त्वनिष्ठ चालकांचें अभिनंदन करणें प्राप्त आहे. हिंदुधर्मांतील ज्या हलके धंदे करणाऱ्या कांहीं शुद्र जाती आहेत त्यांना आपल्यांतील ब्राह्मण्याची इतकी मगरूरी
डब्ल्यू-२०७३-१४ अ