बिचाऱ्या बावळट जाती ब्राह्मण्याच्या उपासक असल्यामुळें खुळ्या धर्मसमजुतीने आपल्या अर्थास आंचवल्या. - Page 254

२१० डॉ. बाबासाहेब आंपेडकर लेखन आणि भाषणे

असते कीं, अस्पृश्य जातींतील माणसांचा पैसा घेऊनहि काम करण्याचें त्या जाती नाकारतात. धोबी म्हणतो मी कपडे धुणार नाहीं, न्हावी म्हणतो मी हजामत करणार नाहीं, चौघडेवाला म्हणतो मी वाजवणार नाहीं ! हें कां तर पैसे देत नाहींत म्हणून नव्हें, तर अस्पृश्यांची सेवा केल्यानें आपली मानखंडना होते म्हणून ! या लोकांना मान गुणावर अवलंबून आहे जातीवर नाहीं याची शिकवण कोणी तरी, केव्हांतरी द्यावयास पाहिजे होती. ती दयानंद कॉलेजच्या व्यवस्थापकांनी दिली हें बरें झालें. कुळाचा मिथ्याभिमान धरून गुणवानास हिणवू पाहणाऱ्या गुणहीनांना अशा प्रकारची अद्दल घडणें योग्य आहे. आम्हांस वाईट वाटतें तें इतकेच कीं, या बिचाऱ्या बावळट जाती ब्राह्मण्याच्या उपासक असल्यामुळें खुळ्या धर्मसमजुतीनें आपल्या अर्थास आंचवल्या आहेत. पण या निराधार झालेल्या स्वयंपाक्याची चिता करण्याचें कोणालाच कारण नाही. स्वार्थाची पर्वा न करितां धर्माचें रक्षण केल्यामुळें त्यांची पाठ थोपटणारे ' भालाकार ' त्यांना जन्मभर पोसणार आहेत म्हणतात !

७०७७

आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत, ता. १५ जुलै १९२७.

डब्ल्यू-२०७३-१४ ब