त्यांनी मुसलमानांचे सदैव ऋणी राहिलें पाहिजे - Page 255

४९
पा स त्यांनी मुसलमानांचे सदैव ऋणी
राहिलें पाहिजे.

खान-पाणंदीकर विवाहामुळे हिंदु मुसलमानांचें संघटण कसें सुलभ होईल या विषयीचें आमचें मत गेल्या अंकीं* आम्हीं जाहीर Hers आहे. जवळ जवळ सारी स्पृश्य जनता आमच्या मताच्या विरुद्ध आहे असें दिसतें. आतां हा विवाह जरी हिंदु-मसलमानांच्या संघटणेस कारणीभूत झाला नाहीं तरी स्पृश्य-अस्पृश्यांच्या संघटणेस कारणीभूत होईल असे वाटतें. कारण या विवाहानें चिडून गेलेले स्पृश्य लोक असें म्हणूं लागले आहेत कीं '' मालिनीनें महाराबरोबर विवाह केला असता तरी आम्हीं कांहीं म्हणालों नसतों. “ ही भाषा हिंदुलोकांच्या तोंडांतून येणें किती अशक्य आहे हें सर्वासच अवगत आहे. ती आली याला कारण पीर पावला हेंच होय. हिंदुलोकांतर्फ होत असलेल्या अस्पृश्योद्धारासाठीं त्यांनीं मुसलमानांचे सदैव ऋणी राहिलें पाहिजे, असें जें आम्ही म्हणतो याला आतां कोणास ना म्हणतां येईल काय ?

७७७

त ता क न म are eee

* पहा पृष्ठ क्र. १६५-१६८.

आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत, ता. १५ जुलै १९२७.