आप घरी बाटा, बाप घरींही बाटा | - Page 256

५०

आप घरी बाटा, बाप घरीहि बाटा !

मुंबई इलाख्यांतील शिक्षणखात्याचा अहवाल जो कोणी काळजीपूर्वक वाचून पाहील व त्याचें मनन करील त्याला या इलाख्यांतील शिक्षणाच्या प्रसाराचा प्रकार पाहून आश्चर्य वाटल्या वांचून राहणार नाहीं. शिक्षणाच्या प्रसाराचा हिशोब देण्याकरितां या इलाख्यांतील प्रजेचे चार विभाग करण्यांत आले आहेत. (१) पुढारलेला वर्ग, अथवा ब्राह्मण व तत्सम जाती, (२) मध्यम वर्ग अथवा मराठा व तत्सम जाती, (३) कनिष्ठ वर्ग अथवा अस्पृश्य व तत्सम जाती, आणि (४) मुसलमान वर्ग. लोकसंख्येच्या मानानें पाहिलें तर मराठा व तत्सम जाती यांचा पहिला, अस्पृश्य व तत्सम जातींचा दुसरा, मुसलमान वर्गाचा तिसरा आणि ब्राह्मण व तत्सम जातीचा चवथा नंबर लागेल. शिक्षणप्रसाराच्या दृष्टीनेंहि असाच अनुक्रम लागावयास पाहिजे. पण खरा प्रकार अगदीं उलट आहे. मराठा व तत्सम जातींचा लोकसंख्येच्या मानानें पहिला नंबर लागतो. पण उच्च शिक्षणांत तसाच दुय्यम व प्राथमिक शिक्षणांत त्यांचा तिसरा नंबर आहे. अस्पृश्य व तत्सम जातींचा लोकसंख्येच्या मानानें दुसरा नंबर लागतो. पण उच्च शिक्षणांत तसाच दुय्यम व प्राथमिक शिक्षणांत त्यांचा नंबर चवथा म्हणजे शेवटचा आहे. मुसलमान वर्गाचा लोकसंख्येच्या मानानें तिसरा नंबर आहे. परंतु उच्च शिक्षणांत तसाच दुय्यम व प्राथमिक शिक्षणांत त्यांचा नंबर दुसरा म्हणजे मराठा व तत्सम जाती व अस्पृश्य व तत्सम जाती यांच्यावरचा आहे ! या सर्वांना कळस म्हणून समजल्या जाणाऱ्या ब्राह्मण व तत्सम जातींचा लोकसंख्येच्या मानानें चवथा म्हणजे शेवटचा नंबर लागतो. पण नवलावा हा कीं या चिमुकल्या जातींनी उच्च शिक्षणांत तसेंच दुय्यम व प्राथमिक शिक्षणांत पहिला नंबर पटकाविला आहे. या इलाख्यांतील शिक्षणप्रसाराच्या अध्यायांतील ही कथा विस्मयकारक आहेच. पण वर जी निरनिराळ्या जातींची शिक्षणांतील नंबरवारी दिली आहे तिच्यावरून एका वर्गाने दुसऱ्या वर्गास किती टांगांनीं मारलें आहे याचा बोध होणें शक्‍य नाहीं. तें कळण्यास दरेक ania किती अंतर पडलें