आमचे टीकाकार . - Page 268

२२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

उत्तर पुण्याच्या एका सभेमध्ये आम्ही दिले आहे. त्या सभेची हकीकत! दुसरीकडे दिली आहे. ती वाचकांनी अवश्य वाचावी स्वजनांतील टीकाकारांच्या बाबतींत तूर्त आम्ही यापेक्षां जास्त कांहीं लिहूं इच्छीत नाहीं.

आतां उच्चवर्णीय म्हणविणाऱ्या हिंदु लोकांमधील आमच्या टीकाकारांचा थोडक्यांत परामर्श घेऊं. या टीकाकारांचा आमच्यावर सर्वांत अधिक रोष होण्याचें कारण हें कीं, अस्पृश्यतेचे शक्‍य तितक्या लवकर निवारण न झाल्यास अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांनी धर्मांतराचा मार्ग स्वीकारावा असे आम्हीं प्रतिपादितों. धर्मांतराला जर आम्ही आतुर असतों आणि अस्पृश्यतानिवारणाचा प्रश्‍न स्वतःपुरता व स्वत:च्या पुढील पिढीपुरताच आम्हांस सोडवावयाचा असता तर आम्हीं तसें यापूर्वीच केलें असतें. परंतु शक्यतोवर हिंदु धर्मांत राहावयाचे

आणि आपल्या बहिष्कृत बंधूंनाहि त्या धर्मांत ठेवावयाचें तसेंच

अस्पृश्यतानिवारणासंबंधानें स्वतःपुरतेच न पाहतां अखिल बहिष्कृत वर्गाच्या दृष्टीनें विचार करावयाचा, अशीच आमची इच्छा असल्यामुळे आम्हीं आमचें सध्यांचे प्रयत्न चालविले आहेत. तथापि, कोणत्याही एका व्यक्तींच्या काय किंवा एकाद्या वर्गाच्या काय, सहनशीलतेला मर्यादा ही असावयाचीच. उच्चवर्णीय म्हणविणारे लोक न्यायान्याय, धर्माधर्म, पापपुण्य, सारासार यांचा विचार न करतां बहिष्कृत वर्गावरील अस्पृश्यतेचा शिक्का कायम ठेवण्याचाच हेका धरतील आणि आपल्या बहुसंख्येच्या आणि आर्थिक donde घमेडींत बहिष्कृत वर्गाच्या युक्तिवादाला धाब्यावर बसवितील तर बहिष्कृत वर्गाला धर्मांतरासंबंधाच्या प्रश्‍नाचा विचार करणें भाग पडेल असें आम्ही आतांहि पुनःस्पष्ट म्हणतो. महाड प्रकरणावर लिहितांना ' भाला ' कारासारख्यांनीं बहिष्कृतांच्या ' पाठी सडकण्याची ' धमकी दिली असतां त्यांना जसें उत्तर द्यावयाला पाहिजे होतें तसें आम्हीं दिलं आणि त्याच वेळी आमचे वाजवी हक्क स्वधर्मात राहून मिळण्याची निराशा झाल्यावर आम्ही परधर्माचा अंगीकार करून आमचे वाजवी हक्क मिळविण्याची पाळी आली तर तसें करण्यासहि कमी करणार नाही असें बजावले. यांत काय चुकलें हे आम्हांस तरी समजत नाहीं. ' आम्ही तुमच्या लाथा खाऊ ! पण तुमच्याच धर्मात राहूं ' असें आम्ही म्हणावें अशी आमच्या टीकाकारांची अपेक्षा आहे काय ? तुमचा आमचा धर्म जर एक तर तुम्हांला आम्हांला हक्क सारखेच. माणसामाणसांत जो धर्म पंक्तिप्रपंच करतो, कोट्यावधी लोकांना त्यांचा स्वतःचा कांही अपराध नसतां गुन्हेगारांपेक्षांहि वाईट रीतीनें वागवितो, विशिष्ट वर्गातल्या लोकांना पिढ्यानपिढ्या इहलोकच्या

† पाहा, खंड १८, भाग १, पृ. ५६-५९.