आमचे टीकाकार . - Page 269

आमचे टीकाकार २२५

नरकयातना भोगावयाला लावतो, माणसें असून त्यांना जनावरांना मिळणाऱ्याही

सवलती लाभू देत नाहीं तो धर्मु तरी कसला ? तशा धर्माला ' धर्म ' हें नावंच

योग्य नाहीं. या धर्मासंबंधाने आमच्या मनांत आपलेपणाची भावना तीव्रतेने कशी असूं शकेल ? हिंदुधर्म सर्वांना समतेनें वागवील तर त्याच्याविषयी सर्वांना सारखाच अभिमान व आपलेपणा वाटेल. ' धर्म ' शब्दाची व्याख्या तरी काय ? शास्त्रीपंडिताना सर्वसंमत अशी व्याख्या

'' यतोऽभ्युदयनिःश्रेयससिद्धिःस धर्म :“"

ही होय. " ज्याच्या योगानें अभ्युदय (ऐहिक उन्नती) व मोक्ष यांची प्राप्ती होते तो धर्म “ असा या वाक्याचा अर्थ आहे. आधीं अभ्युदय व मग मोक्ष असा या व्याख्येंतील साध्यामध्यें क्रम ठेवलेला आहे. ' अभ्युदय ' म्हणजे संसारातील उत्कर्ष किंवा उन्नती (Prosperity or elevation) हे धर्माचें पहिलें साध्य होय. या दृष्टीनें दिचार केल्यास प्रचलित हिंदु धर्म अस्पृश्य मानलेल्या वर्गांचा धर्म कितपत होऊं शकतो याचा टिकाकारांनींच विचार करावा. अस्पृश्यता ही गोष्टच अशी आहे कीं, तिच्यामुळे अभ्युदयाचा मार्गच बंद होतो. अस्पृश्यतेमुळें ' समाजांत मोकळेपणी वावरता येत नाहीं, बहिष्कृत होऊन समाजाबाहेर घाणेरड्या वस्तींत रहावें लागतें, शिक्षण घेतां येत नाहीं, प्रतिष्ठित धंदे करतां येत नाहींत ; मग अभ्युदय कसा व्हावयाचा ? आज हिंदुसमाजात धर्माच्या बाबंतीत अशी व्याख्या आहे की, धर्माचे जें प्रथम साध्य अभ्युदय तें अस्पृश्य म्हटलेल्या लोकांच्या बाबतींत तेवढें लागू नाही ! ' निःश्रेयस ' मात्र सर्वांना मोकळें ठेवलेलें आहे ! निःश्रेयस्‌ म्हणजे मोक्ष, तो पाहिला कोणीं व कोठें आहे ? त्याची प्राप्ती शुद्रांना, अतिशुद्रांना झाली तरी उच्चवर्णीयांचे काय वेंचावयाचें ? शिवाय त्यांतही मेख आहेच. त्रैवार्णिकांची सेवाचाकरी करण्यानेच शुद्रांना व अतिशुद्रांना मरणोत्तर सदृगति मिळेल असे धूर्त शास्त्रकारांनी लिहून ठेवलेलेंच-आहे. याचा अर्थ असा कीं, “तुम्ही जीवंत असतां आमच्या गुलामगिरीत रहां, नरकवास भोगा, म्हणजे मेल्यावर तुम्हांला स्वर्गप्राप्ती होईल !” जो धर्म आम्हांला असें सांगतो त्या धर्माविषयी आम्हांला आपलेपणा कसा वाटावा ? ज्या लोकांना अभ्युदयाचे मार्ग . त्या धर्माने मोकळे ठेवले आहेत आणि विशिष्ट वर्गावर कुर्घोडी करण्याचे ताम्रपट देऊन ठेवले आहेत त्यांनीं अशा धर्मांचे खुशाल गोडवे गावे; परंतु ज्या वर्गांना धर्माच्या नांवावर शतकानुशकें जुलूम सोसावा लागत आहे त्या वर्गातील लोकांना त्या धर्माविषयीं तितकेच प्रेम वाटणें कसें शक्य आहे ? हिंदुधर्मात उच्च तत्त्वज्ञान

डब्ल्यू-२०७३-१५ अ