आमचे टीकाकार २२७
रोहिदासांसारख्या साधूंना ऐहिक गोष्टींची पर्वा नव्हती, त्यांचे सर्व लक्ष्य परमेश्वराकडेच वेधलें होतें. त्यांचे उदाहरण साधारण लोकांना काय उपयोगाचे ? जसे सर्वच ब्राह्मण किंवा सर्वच स्पृश्यवर्गीय लोक साधु नाहींत किंवा साधु व्हावयास पात्र नाहीत, त्याप्रमाणे बहिष्कृत वर्गातले सर्वच लोक साधू नाहींत व साधु व्हावयाला पात्रहि नाहीत. समाजरचनेविषयीचा विचार साधारण जनसमुहाच्या दृष्टीनेंच केला पाहिजे. चोखोबामहाराजांच्या नांवांला हल्लीं उच्चवर्णीय लोक मान देतात, पण जीवंतपणी चोखोबांना ढोरें ओढण्याचाच धंदा करावा लागला ना ? पोटासांठी मोलमजुरी करीत असतां अपघात होऊन चोखोबा कोसळलेल्या तटाखाली सांपडून गतप्राण झाले ना ? ज्या वेळी चोखोबा महार म्हणून ढोरें ओढीत होते त्या वेळी अंगी लायकी नसतां ब्राह्मण वगैरे लोक उच्च धंदे करीत होते. याच समाजरचनेच्या विरुद्ध आमचा आक्षेप आहे. अस्पृश्यता म्हणजे गुलामगिरीचाच एक प्रकार आहे. कांही वर्गांना कांहीं निमित्तावरून अस्पृश्य ठरवावयाचें, त्यांच्याकडून समाजांतली घाणेरडीं कामें करून घ्यावयाची, त्यांना तिरस्काराने वागवावयाचें, त्यांचे नागरिकत्वाचे हक्क हिरावून घ्यावयाचे आणि पिढ्यान् पिढ्या त्यांनी त्याच स्थितींत रहावें याकरितां त्यांचे शिक्षण वगैरे आत्मोन्नतीचे मार्ग बंद करून टाकावयाचे, त्यांतले कोणी लोक आपले माणुसकीचे हक्क मांगू लागले तर त्यांना बंडखोर ठरवावयाचे, त्यांना कांही हक्क सवलती मिळू नयेत म्हणून आकाशपातळ एक करावयाचें आणि प्रसंगी अत्याचार करूनहि त्यांच्या हक्कांच्या आड यावयाचे हे प्रकार जसे गुलामगिरीच्या इतिहासांत तसेच या देशांतील अस्पृश्यतेच्या इतिहासांतहि दिसून येतात. लॉर्ड ऑलिव्हीयर यांनी लिहिलेल्या व हल्लींच प्रसिद्ध झालेल्या “The Anatomy of African Misery” या पुस्तकांत आफ्रिकेतल्या निग्रो लोकांना गोऱ्या लोकांनी आतांपर्यंत कसें वागविलें व आजहि ते त्यांना कसें वागवित आहेत त्याचें हृदयद्रावक वर्णन केलें आहे. तें या देशांतल्या अस्पृश्यांच्या बाबतींत बरेंचसे लागू पडतें. लॉर्ड ऑलिव्हियर एका ठिकाणी
म्हणतात :-
The slave relation, being once established, is automatically and in part
unconsciously buttressed by a resolute refusal to admit that the slave is capable of anything better; and when, in the development of competitive industrialism, opportunities arise for his showing that he is capable, the fear of his competition with the established master race adds feelings of jealousy and hatred to the fear and contempt, and reinforces the