आमचे टीकाकार . - Page 273

आमचे टीकाकार २२९

कित्येक हॉटेलांमध्ये जाऊन गोऱ्या मडमांबरोबर नाचण्याची बंदी केली एवढ्याच

गोष्टीवरून तुम्हीं आकाशपाताळ एक केलें ! पण अस्पृश्यतेच्या पायीं होणारी

मानहानि आणि उन्नतिच्या मार्गांत होणारी कायमची बंदी यांच्यापुढें सदरील निर्बध

म्हणजे कांहीच नव्हत ही गोष्ट अद्यापि तुम्हांला पटत नाही. कै. टिळकांसारखी

एकादी व्यक्ति बहिष्कृत वर्गांत जन्माला आली असती आणि ब्रिटिश अमलाखाली

झालेल्या मन्वंतराचा फायदा मिळून तशा गृहस्थाला तसेंच उच्च शिक्षण मिळालें

असतें तर त्या गृहस्थांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” अशी गर्जना

करण्याच्या भरीस न पडतां 'अस्पृश्यता नष्टमूल करणे हें माझें कर्तव्य आहे' असेंच

खात्रीनें म्हटलें असतें आणि À यथा मां प्रपद्यते तांस्तथैव भजाम्यहम्‌" हा गीतेतील

आपला आवडता शलोकार्ध पुढें करून धार्मिक व सामाजिक हक्क मिळविण्याच्या

बाबतींत 'बाप दाखवा नाहीं तर श्राद्ध घाला' असें उच्चवर्णीय लोकांना उघड

आव्हान केलें असतें अशी आमची खात्री आहे. पण 'परदुःख शीतळ'

असल्याकारणानें शहाण्यासुर्त्या, समजूतदार म्हणविणाऱ्या आणि समानतेच्या

हक्कांची राजकीय बाबतींत तारस्वरांने सदैव घोषणा करणाऱ्या लोकांनाहि

बहिष्कृतांच्या दुःखांचे कांहीच वाटत नाहीं. ते बहिष्कृतांना शांतिपाठ शिकविण्याचें धाष्टर्य करितात आणि कित्येक तर निर्लज्जपणानें धमक्याहि देतात. या देशावर मुसलमानांच्या स्वाऱ्या झाल्या, मुसलमानी सत्ता स्थापित होऊन कोट्यवधि मुसलमान अस्तित्वांत आले, पुढें ब्रिटीश राजसत्ता स्थापित होऊन इंग्रजी शिक्षणाचा प्रसार झाला, खिस्ती मिशनऱ्यांचे काम या देशांत जोरांने चालू झालें. या गोष्टी इतर हिंदूना आपत्तीप्रमाणे वाटत असल्या तरी आम्हां बहिष्कृतांच्या सुदैवानेंच त्या घडून आल्या असें आम्ही समजतो. नाहीपेक्षां बहिष्कृत वर्गाला आजचे दिवससुद्धां पाहावयास मिळाले नसते, त्यांना आपली दुःखे बोलून दाखविण्यास वाचाहि प्राप्त झाली नसती, आणि संख्याबलाचा प्रश्‍न देशांतल्या देशांत उपस्थित झाला नसता तर सध्यां जे अनेक लोक बहिष्कृतांविषयी वरपांगी कळवळा दाखवीत आहेत त्यांना तो दाखविण्याचे कारणच पडले नसतें. ही साधी गोष्ट स्वत:च्या सोयीपुरती विसरणारे लोक आम्ही धर्मातरांचे नांव काढलें कीं आमच्यावर गरम होतात त्यांचें आम्हांस आश्चर्य वाटतें. "तुम्ही

जोपर्यंत आमच्या धर्मांत आहां तोंपर्यंत सार्वजनिक विहिरीतलावांच्या पाण्याला तुम्ही शिवतां कामा नये, तुम्हांला आमच्यापासून RRA राहिलें पाहिजे, आमच्या देवळाजवळ तुमची सावलीहि पडतां कामा नये”. असेंच आज आम्हांस इतर हिंदुसमाज सांगत आहे. उलट पक्षी आम्ही खिस्ती, विशेषतः मुसलमान, झालों