५४
संख्या फुगवून हिंदु समाजाच्या नांवावर उच्च
वर्णीयांनी विशेष हक्क व सवलती स्वत:साठी
मिळविण्याचा मार्ग
त्रावणकोर संस्थानामधील एका ठिकाणी अस्पृश्य मानलेल्या वर्गातील लोकांकरितां एक वेगळा रस्ता काढण्याची सूचना तेथल्या कायदेकौन्सिलमध्यें पसार झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. अस्पृश्यांकरितां वेगळी देवळें बांधण्याच्या सूचनेला विरोध करितांना, अशा वेगळेपणाचे पर्यवसान शेवटीं वेगळ्या धर्मशाळा, वेगळ्या विहिरी, वेगळे रस्ते वगैरेंमध्ये होऊन शेवटीं अस्पृश्यता आहे तशी कायम राहील अशी भीति आम्हीं व्यक्त केली होती. त्या भीतीचें प्रत्यंतर त्रावणकोरमधील वरील सूचनेवरून दिसून येते. जेथें बहिष्कृतांच्या स्पर्शाने रस्ते विटाळतात तेथें अस्पृश्यता नाहींशी होण्याची आशा तरी बाळगतां येईल काय ? बहिष्कृतांना असल्या BAIT सवलतींची मुळींच जरूरी नाहीं. त्यांत त्यांचे हित नाहीं, कारण अशा ढोंगी सवलतीमुळें अस्पृश्यता नाहींशी होण्याला मदत न होता ती वजलेप मात्र होणार आहे. बहिष्कृत लोक आपल्याला हिंदूंच्या देवळांत जाण्यास मोकळीक असावी, हिंदुधर्मीय या नात्यानें आपला तो हक्क आहे अशी मागणी करीत आहेत तर कांहीं धूर्त लोक आम्ही तुम्हांला निराळी देवळे देतों, तुमच्यासाठी निराळे रस्ते बांधतों असें सांगत आहेत. याचा अर्थ असा कीं, बहिष्कृतांनी चिरकाल बहिष्कृतच रहावें, त्यांना आपलीं डोकीं वर काढण्यास केव्हांच सवड मिळूं नये, आणि अशा थोड्या सवलती तोंडावर टाकून हिंदुधर्मीय लोकांची संख्या फुगवून दाखवून अखिल हिंदुसमाजाच्या नांवावर उच्च वर्णीय म्हणविणाऱ्या लोकांना विशेष हक्क व सवलती स्वतःसाठी मिळविण्याचा मार्ग मोकळा राहावा ! बहिष्कृतांसाठी देवळें वेगळी, त्यांना चालण्यासाठी रस्ते वेगळे, असे बंड चालू दिल्यास, हिंदुलोकांना स्वराज्य मिळाल्यावर बहिष्कृतांसाठीं आगगाड्या किंवा आगगाड्यांचे डबे वेगळे, येथपर्यंतहि पाळी यावयाची आणि पेशवाईचें पुनरुज्जीवन होऊन महाराष्ट्रांतसुद्धां बहिष्कृतांना गळ्यांत मडकीं बांधून
fer लागावयाचें ! सारांश, अस्पृश्यांसाठी निराळीं देवळें व निराळे रस्ते
बांधणें ही प्रगति नसून पुच्छप्रगतिच होय. मलबारमधील अस्पृश्य मानलेल्या जातींमध्यें ताडी काढणें वगैरे धंदे करणाऱ्या कित्येक जाती असून त्यांची राहणी