संख्या फुगवून हिंदु समाजाच्या नांवावर उच्च वर्णीयांनी विशेष हक्क व सवलती स्वतःसाठी मिळविण्याचा मार्ग. - Page 277

संख्या फुगवून हिंदु समाजाच्या . . . . स्वत:साठी मिळविण्याचा मार्ग २३३

तेथल्या कित्येक उच्च जातींपेक्षांहि स्वच्छ आहे आणि त्यांमध्यें कैक पुरुष व स्त्रियाहि विश्वविद्यालयाच्या पदवीधर आहेत. अर्थात्‌ राहणी व संस्कृति यांचा त्यांच्या अस्पृश्यतेशीं कांहीं. संबंध नसून केवळ दुराग्रहच अस्पृश्यतेच्या मुळाशीं आहे. अशा जुलुमाला कंटाळून दरसाल शेंकडों कुटुंबे तिकडे खिस्ती होतात यांत आश्चर्य आहे काय ? हिंदुसंघटनवाद्यांचें इकडे लक्ष जात नाहीं, त्यांना अन्यायाची चीड येत नाहीं, आपल्या जातभाईचा मूर्खपणा त्यांच्या डोळ्यांना दिसत नाहीं, आणि एकाद्या मालिनीबाईनें एखाद्या खानाशी विवाह केला म्हणजे मात्र त्यांच्या धर्माभिमानाला ऊत येतो !

आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत, ता. १२ ऑगष्ट १९२७.