५६
महाडच्या मारामारीचे खापर स्पृश्य जातीच्या
अशिक्षितांवर फोडणाऱर्यांचे खरे स्वरूप
महाड येथील ज्या ' चवदार ' तळ्याच्या बाबतींत एवढें रण माजलें, आणि साऱया हिंदुस्थान देशांत गवगवा झाला त्या ' चवदार ' तळ्याचे शुद्धीकरण t करूनच महाडचे सोवळे लोक उगी राहिले नाहींत. पूर्वी एका ठरावाच्याद्वारें सदरील तळें सर्व जातींच्या लोकांना मोकळें ठेवण्यांत आलें होतें व त्यानंतरच बहिष्कृत लोकांची परिषद भरून त्याचें पाणी परिषदेचे प्रतिनिधी प्याले. हल्लीं तेथल्या म्युनिसिपालिटीनें सदरील पूर्वीचा ठराव बहुमतानें रद्द केल्याची खात्रीलायक बातमी * आम्हांस समजली आहे. महाड म्युनिसिपालिटीमध्यें प्रतिगामी धोरणाच्या सभासदांचाच भरणा असल्यामुळें * चवदार ' तळें wad उच्चवर्णीय हिंदु लोकांपुरतेंच gel ठेवण्याची जी ' सुधारणा ' (!) करण्यांत आली तीबद्दल आम्हांस कांहीं आश्चर्य वाटत नाहीं. महाड म्युनिसिपालिटीनें आपला पूर्वीचा ठराव बदलून अस्पृश्यांना चवदार तळ्यावर जी बंदी केली आहे तिच्याकडे कुलाबा जिल्ह्याच्या कलेक्टराचें लक्ष्य जाऊन म्युनिसिपालिटीला ताळ्यावर आणण्यासाठी योग्य ती तजवीज केली जाईल, अशी आम्हांस आशा आहे. महाड म्युनिसिपालिटीला सदरील नवीन ठरावानें आपण बहिष्कृतांचा आतां कायमचा बंदोबस्त केला असें वाटत असल्यास तो भ्रम आहे. या प्रश्नाचा निकाल असल्या फुसक्या ठरावामुळें बहिष्कृतांच्या विरुद्ध होणें शक्य नाहीं. उलट, महाड येथें सत्याग्रह करून चवदार तळ्याची बहिष्कृतांच्या दृष्टीनें खरी शुद्धि करण्याची जी
चळवळ चालू आहे, त्या चळवळीला मात्र अधिक जोर येणार आहे, हें महाड
म्युनिसिपालिटीच्या अनुदार सभासदांनीं va ध्यानांत ठेवावें. महाडच्या मारामारीचें खापर स्पृश्य जातीच्या अशिक्षित लोकांवर फोडून खादीवाले, प्रतिसहकारवाले वगैरे लोक नामानिराळे होऊं पाहत होते, परंतु हल्लींच्या _
† चवदार तळ्याचे शुद्धीकरण दि. २१ मार्च १९२७ ला केले गेले होते. महाडच्या विष्णुमंदिरात बरह्मवृंदांची सभा भरून १०८ घागरीपाणी चवदार तळ्यातून काढून त्यात वेदोक्तविधीने पंचगव्य (गाईचे मूत्र, शेण, दूध, तूप व दही) मिसळवून ते पुन्हा तळ्यात टाकले गेले होते व तळे शुद्ध झाले असे जाहीर केले गेले होते.
३: पाहा, परिशिष्ट क्रमांक २४.