महाडच्या मारामारीचे खापर स्पृश्य जातीच्या अशिक्षितांवर फोडणाऱ्यांचे खरे स्वरूप - Page 280

२३६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ठरावामुळें त्यांच्या तोंडावरील बुरखा दूर होऊन त्यांचें खरें स्वरूप सर्व जगाला दिसून येत आहे. बहिष्कृत वर्गाच्या योग्य हक्कांविषयीं त्यांना जाणीव असती आणि अशिक्षित गुंडांनीं केलेली मारामारी त्यांना मनापासून नापसंत असती तर तळ्याच्या बाबतींतील पूर्वीचा ठराव रद्द करण्याचा उपद्व्याप त्यांनीं केला नसता, हें सांगावयास नकोच.

७७७

आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत, ता. १२ ऑगष्ट १९२७.