५७
ढोंगीपणा, माथेफिरूपणा व गैरमुत्सद्दीपणा
हिंदुसमाजामधील कित्येक लोकांनी संघटन व शुद्धि या चळवळी सुरु केल्या असून या चळवळींमध्ये शिकलेल्या लोकांचाच भरणा आहे. साधारण बहुजनसमाज या चळवळीपासून साधारणत: अलिप्त आहे असें म्हणावयास हरकत नाही. त्याचप्रमाणें समाजसुधारकांचेंहि या चळवळींमध्ये फारसें अंग नाही. एकंदरीत अर्धवट विचाराच्या लोकांचेंच या चळवळींमध्यें प्राबल्य आहे. जुन्या मताच्या लोकांना शुद्धीची कल्पना परकी वाटते आणि समाज-सुधारणेकडे ज्यांचा ओढा आहे त्यांना समाजसुधारणेच्या द्वारेंच खरें संघटन हिंदुसमाजामध्ये उत्पन्न होईल आणि शुद्धीचें कारण फारसें न उरतां हिंदुसमाजाचें संख्याबल कायम राहून वाढेल असें वाटतें, त्यामुळे ते दोन्ही पक्ष या चळवळीपासून अलग राहिले आहेत. शुद्धीसंघटनाच्या चळवळींमध्ये अर्धवट लोकांची भरताड झाल्यामुळें त्या चळवळीचा व्हावा तसा उपयोग होत नाहीं. इतकेंच नव्हे तर ढोंगीपणा व माथेफिरूपणा यांना ऊत येऊं लागला आहे. सध्यां हिंदुमुसलमानांमध्ये भयंकर तेढ उत्पन्न झाली आहे. तिचा फायदा कांहीं लबाड लोक घेत आहेत. आधींच धार्मिक कलह म्हणजे मुर्खपणाचा बाजार. जेव्हां खऱ्या धर्माची पायमल्ली होते तेव्हांच धार्मिक कलह माजतात. जे [हिंदु ] [व ] [जे ] [मुसलमान ] [सध्यां ] धर्माच्या नांवावर एकमेकांशी भांडत आहेत [त्यांच्यामध्यें ] [खऱ्या ] [धार्मिक ] [वृत्तीची ] माणसें चार दोन तरी सापडतील [किंवा ] [नाहीं ] [याची ] [आम्हांला ] [शंका ] [आहे. ] धर्माला पदोपदी लाथाळणारे लोकच [धर्मांचा ] [आवेश ] [दाखवून ] [दुसऱ्या ] [धर्माच्या ] लोकांचें प्राण घेऊं पाहतात. धर्माने माणसाला! देवदूत बनविलें [पाहिजे. ] परंतु तसें न होतां धार्मिक कलहामुळे [धर्माच्या ] [योगानें ] [माणसाचे ] [माणूसपण ] [जाऊन ] त्याला पशुपणा येत आहे. अशा स्थितीत अशिक्षित गुंड मारामाऱ्या [करितात. ] एकमेकांची टाळकी सडकतात [व ] [खून ] [करितात ] [आणि ] [सुशिक्षित ] [गुंड ] : अल्पायासानें आपापल्या समाजांत [लोकप्रिय ] [होण्याची ] [पर्वणी ] [साधून ] [घेतात. ] अशिक्षित गुंडांच्या दुष्ट कृत्यांची [खरी ] [जबाबदारी ] [खरें ] [म्हटलें ] [असतां ] [सुशिक्षित ] गुंडांवरच आहे. कारण त्याच्या चिथावणीमुळेच [अशिक्षित ] [लोक ] [अत्याचार ] करावयाला प्रवृत्त होतात. सुशिक्षित गुंड जसें हिंदूंत आहेत [तसे ] [मुसलमानांत ] आहेत. पंडितांत आहेत तसे मौलानांमध्यें [आहेत. ] खरें पाहिल्यास धर्माचा [सूक्ष्म ] विचार कोणीच करीत [नाही, ] [धर्माच्या ] [आद्य ] [तत्त्वांची ] [कोणालाच ] [पर्वा ] [नाहीं. ]