ढोंगीपणा, माथेफिरूपणा व गैरमुत्सद्दीपणा - Page 282

२३८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

दुराग्रह व दुरभिमान यांचेच उभय समाजांमध्ये प्राबल्य झालेले आहे. ग्रंथप्रामाण्य, अंधश्रद्धा व अज्ञ समजुती, यांनीं प्रत्येकं धर्माला ग्रासून टाकलेले असल्यामुळे धर्म व सारासार विचार यांच्यांत घटस्फोट झालेला आहे.

मेलेल्या माणसांची मढी व मेलेल्या माणसांचे विचार

यांच्यावरच सध्यांची Wi माजलेली आहेत. सत्य काय हे कोणीच पाहत नाहीं. अमका एक धर्मसंस्थापक काय म्हणाला होता आणि अमक्या एका धर्मग्रंथांत काय म्हटलेलें आहे यालाच सर्व महत्त्व आलेलें असून सत्य कोपऱ्यांत रडत बसले आहे. अशा वेळीं ढोंगी लोकांचें फावावें हे स्वाभाविकच होय.

खान-मालिनी विवाह हीच एक सध्यां गाजत असलेली बाब उदाहरणासाठी घेतली तर ढोंगीपणा व माथेफिरूपणा यांना हल्लींच्या धार्मिक कलहामुळे कसें प्रोत्साहन मिळत आहे तें दिसून येईल. या विषयावरील बाकी विचार आम्हीं या पूर्वीच प्रदर्शित केलेले आहेत. परंतु शिळ्या कढीला ऊत आणण्याची खटपट अजूनहि कित्येक लोकांकडून चालू असल्यामुळें त्या विषयाकडे आम्हीं पुन: वळत आहों. हिंदुसमाजाची कशी दिशाभूल Sia आहे तेंही आम्हांस आज दाखवावयाचें आहे.

एका सुशिक्षित हिंदु स्त्रीने एका सुशिक्षित मुसलमानाशीं विवाह केला त्यामुळें वर्तमानपत्र व जाहीर सभा यांमधून एवढें मोठें काहूर माजविण्यांत आले कीं, हिंदुसमाजावर आकाश कोसळून पडलें असेंच एकाद्याला वाटावयाचें. आज दोन महिने ज्याच्या त्याच्या तोंडीं हाच विषय. हिंदुसमाजावर या गेल्या पांच दहा वर्षातच किती तरी मोठे आघात झाले असतील, परंतु मालिनी-खान विवाहामुळें जेवढी खळबळ उडाली तेवढी खळबळ आतांपर्यंत कशानेंच उडाली नव्हती. स्वामी श्रद्धानंदांच्या खुनावर मराठी वर्तमानपत्रांत wad व जितके लांब लेख आले नाहींत तेवढे व तितके लांब लेख या एका विवाहावर प्रसिद्ध झाले ! पण खरोखर खान-मालिनी विवाह व श्रद्धानंदांचा खून यांची तुलना तरी होऊ शकेल काय ? ज्या हिंदु स्त्रीनें मुसलमानाशीं विवाह केला ती कितीही . . सुशिक्षित व कितीही उच्च जातीची अथवा मोठ्या घराण्यांतील असली तरी ती संख्येच्या दृष्टीने एकच होय. बरें, त्या स्त्रीच्या पाठीमागें,तिचे शेंकडों स्त्रीपुरुष अनुयायी होतें असेंहि नाहीं. म्हणजे, ती स्त्री मूळची ब्राह्मणघराण्यांतली, जुन्या हिंदुघराण्यांतील नव्हती ही गोष्ट बाजूला ठेवून विचार केला तरी तिच्या सदरील विवाहामुळे हिंदुसमाजांतील एक माणूस कमी झालें एवढेंच फार तर संख्याबलाचा