ढोंगीपणा, माथेफिरूपणा व गैरमुत्सद्दीपणा - Page 283

ढोंगीपणा, माथेफिरूपणा व गैरमुत्सद्दीपणा २३९

विचार करतांना म्हणावें लागेल. त्यामुळें मुसलमान समाजांत एका माणसाची भर पडली असेंही कायदेशीर दृष्ट्या म्हणतां यावयाचें नाही. कारण विवाह नोंदतांना वर व वधू या उभयतांनी आपण कोणत्याच धर्माचे नाहीं असें म्हटलेलें आहे. अर्थात्‌, एका माणसाची भर न पडतां मुसलमान समाजांतला एक माणूस कमीच झालेला आहे. असें असतांहि या विवाहविरुद्ध केवढी

ओरड ! आपल्यातली माणसे परधर्मात जातात व त्यामुळे आपल्या धर्माचें

संख्याबळ कमी होतें याबद्दलच जर या ओरड करणाऱ्या लोकांना मनापासून हळहळ वाटत असती तर या एवढ्या लहानशा गोष्टीला भलतेंच महत्त्व न देतां त्यांनीं स्वधर्मसंरक्षणाचा विचार केला असता. हिंदुसमाजांतून दरदिवशी शेंकडों माणसें परधर्मांत जात आहेत त्याबद्दल जर खान-मालिनी-विवाहबद्दल आक्रोश करणाऱ्या लोकांना खरोखर हळहळ वाटली असती तर त्रैराशिक दृष्ट्या विचार केल्यास त्यांनी शोकाकूल होऊन प्राणच सोडले पाहिजे होते ! घराला मोठमोठी भगदाडे पडलीं आहेत तिकडे न पाहातां एकादें लहानसें बिक पाहून घराचा मालक जर छाती पिटून रडूं लागला तर ते जितकें हास्यास्पद होईल तितकाच मालिनी-खान विवाहाविरुद्ध झालेला व होत असलेला आक्रोश हास्यास्पद आहे. असल्या मुर्खपणाच्या ओरडीनें भगदाडें आपोआप बंद होणार नाहींत. हिंदुसमाजात ज्या मुर्खपणाच्या व घाणेरड्या समजुती दृढमूल झाल्या आहेत, त्यांच्यामुळे हिंदू समाज विस्कळित व दुर्बळ बनलेला आहे, त्या समजुती

व त्यांना अनुसरून असलेल्या चालीरीती यांच्याकडे लक्ष द्यावयाचें नाहीं आणि

भलत्याच गोष्टीला नसतें महत्त्व देऊन आकाशपाताळ एक करावयाचें हा कालाचा व उत्साहाचा शुद्ध दुरुपयोग होय. जो कोणी बारकाईनें पाहील त्याला हिंदुधर्मांतील शेंकोडों माणसें दरदिवशी परधर्मांत कां जातात तें सहज कळून येईल. कित्येक ठिकाणी मुसलमान हिंदु लोकांच्या भेडकपणाचा फायदा घेऊन त्यांच्या बायका पळवीत आहेत आणि त्याखेरीज अनेक माणसें सामाजिक व धार्मिक जुलूमाला कंटाळून आपखूषीनें परधर्माचा अंगीकार करीत आहेत. अस्पृश्य मानलेल्या वर्गातील लोकांची संख्या त्यांत मोठी आहे. शिवाय हिंदुसमाजांतील कित्येक जातींमध्ये विधवांच्या पुनर्विवाहाला बंदी असल्यामुळे उच्चवर्णीय म्हणविणाऱ्या लोकांच्या घरांतल्या कैक विधवा मुसलमानांच्या बिबी होत आंहेत. मग एकट्या मालिनीबाईच्या विवाहाविरूद्धच एवढी ओरड कां ? पांडवांच्या राजसूययज्ञाच्या वेळी पुष्कळ ब्राह्मण जेवलें तथापि स्वर्गात घंटा वाजल्या नाहींत, परंतु शुकमहर्षि राधूच्या रुपानें शिते खाऊं लागले तेव्हां शितागणिक लक्षमोजन झालें म्हणून स्वर्गात घंटा वाजूं लागल्या अशी एक गोष्ट आहे. तसेंच महत्त्व खान-मालिनीविवाहाला द्यावयाचें असल्यास न कळे! म्हणजे