ढोंगीपणा, माथेफिरूपणा व गैरमुत्सद्दीपणा - Page 285

ढोंगीपणा, माथेफिरूपणा व गैरमुत्सद्दीपणा २४१

सर शंकरन्‌ नायर यांनीं केलेला उपदेश t

हिंदुसमाज लक्षांत ठेवील तरच खरें हिंदुसंघटन अस्तित्वांत येईल. जातिभेद- निराकरण व अस्पृश्यतानिवारण हीं जोपर्यंत झालीं नाहींत तोपर्यंत संघटनांच्या व शुद्धीच्या गप्पा व्यर्थ आहेत. पण खानमालिनीविवाहाविरुद्ध सारखी ओरड करणारे लोक या प्रश्नावर कधीं कळकळीनें लिहितील तर शपथ ! कारण त्यांना पक्कै ठाऊक आहे कीं, अशा विषयांवर लिहिलें तर अज्ञ लोकांना तें आवडणार नाहीं आणि आपल्या पत्रांच्या प्रती अधिक खपणार नाहींतच, पण असलेला खप मात्र कमी होईल ! लोकांना मूर्ख किंवा माथेफिरू बनविणें सोपें असतें, पण शहाणपणा शिकविणे सोपें नसतें. जर या लेखकांना आपल्या लेखनकौशल्याची घमेंड असेल तर त्यांनी अशा विषयांवर लेख लिहून आपल्या पत्राची लोकप्रियता थोडी तरी वाढवून दाखवावी. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे एकीकडे ढोंगीपणा

आणि दुसरीकडे विचारशून्यता यांच्यामुळें मूर्खपणाला व निष्कारण माथेफिरूपणाला

उत्तेजन मिळतें. अशा मूर्खपणामुळें हिंदुसमाजाचा फायदा न होतां उलट तोटाच होईल. एक तर यामुळें समाजाची दिशाभूल होते, योग्य उपायांकडे दुर्लक्ष होते आणि गैरमुत्सद्दीपणामुळें हिंदुंच्या प्रतिपक्षाचा मात्र फायदा होतो. खानमालिनीविवाहावर टीका करतांना कित्येक पदवीधर लेखकांनी गटारें उपसलींच, पण कित्येक पदवीधर वक्त्यांनी जाहीर सभांत अश्लील ध्वनी काढून आपल्या मनोवृत्तीच्या क्षुद्रतेचें जाहीर प्रदर्शन केलें आणि आपल्या उच्च शिक्षणाला काळिमा आणला ! शिवाय या घाणेरड्या चळवळींत गैरमुत्सद्दीपणाचेंही प्रदर्शन झालें. या लोकांना शुद्धीची जर खरोखर कळकळ असती तर मि. व मिसेस खान यांना हिंदुसमाजांत आणण्याचे प्रयत्न त्यांनीं केले असतें. कदाचित थोड्या वर्षांनी ते प्रयत्न यशस्वी होऊन मि. खान हे हिंदु निदान ब्राम्हो तरी झाले असते. सर शंकरन्‌ नायर यांच्या नागपूर येथील भाषणांत असा एक उल्लेख

आढळतो कीं, मद्रास इलाख्यामध्यें रोमन कॅथोलिक पाद्री आपल्या धर्मातल्या

तरुणींशीं हिंदूंनी लग्नें लावावीं अशासाठी प्रयत्न करीत ; हेतु हा कीं, ते हिंदु लोक आपल्या धर्माच्या जाळ्यांत अडकावेत. मि. व मिसेस खान यांच्याविरुद्ध एवढा गवगवा करण्यांत आला नसता, मिसेस खान यांच्यावर शिव्याशापांची लाखोली वाहण्यांत आली नसती आणि हिंदु समाजांत त्या उभयतांना प्रेमानें वागविण्यांत आलें असतें तर त्यांना आत्मसात्‌ करणें हिंदु समाजाला शक्‍य झालें असतें. एखाद्या हिंदूनें मुसलमान स्त्रीशीं विवाह केला असता तर ' श्रद्धानंद '

† पाहा, परिशिष्ट - २५.

डब्ल्यू-२०७३-१६ अ