ढोंगीपणा, माथेफिरूपणा व गैरमुत्सद्दीपणा - Page 286

२४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

प्रभृति संघटन शुद्धिवादी पत्रांची हरकत नव्हती असें त्यामधील लेखांवरून दिसतें. तेवढाच प्रश्‍न असेल तर उद्यां एकाद्या खदिजा बिबीशीं किंवा फातिमा बिबीशीं एकादा पंत किंवा राव लग्न लावील व फिटाफिट होऊन जाईल. मग त्याबद्दल इतका आक्रोश कशाला ?

अग्रलेख, बहिष्कृत भारत, ता. १२ ऑगष्ट १९२७.

डब्ल्यू-२०७३-१६ ब