वऱहाडांतील ब्राह्मणेतर पक्ष आपल्या सत्वाला नेहमींचा जागता आहे. - Page 287

५८
वम्हाडांतील ब्राह्मणेतर पक्ष आपल्या सत्वाला
नेहमीचा जागता आहे

व-हाडप्रांतांत उमरावती येथें श्रीअंबादेवीचें एक पुरातन देवालय आहे. या देवालयाची व्यवस्था करण्याकरितां एक पंचकमिटी स्थापन झालेली आहे. wak देवालयांत आपला प्रवेश व्हावा म्हणून तेथील स्थानिक अस्पृश्य लोक गेल्या दोन वर्षांपासून scar देवस्थान कमिटीकडे विनवणी करीत असत. गतसालीं सदहू व्यवस्थापक कमिटीने अस्पृश्यांच्या अर्जावर खालील ठराव पास केला. "' श्रीअंबादेवी-संस्थान व एकवीरादेवी-संस्थान ही संस्थानें

फार प्राचीन असून आजपर्यंत अस्पृश्य दर्शनास आले नाहीत, व त्यांना येऊ देण्यानें जवळ जवळ सर्वच सनातन-धर्मीयांच्या मनोवृत्तीस जबर धक्का बसून समाजामध्यें

प्रक्षोभ उत्पन्न होण्याचा संभव आहे. समाजाची घडी एकदम बिघडविणें बरेंच घोक्याचें आहे. ही सभा सनातनधर्मीय नागरिक लोकांकडून नेभलेली असून सर्व बाबतींत पूर्णपणें त्यांस ती जबाबदार आहे. आजपर्यंत ह्या सभेस अशा प्रश्‍नाचा विचार करण्याचा प्रसंग आला नव्हता. वर्णाश्रमधर्माप्रमाणें सर्व सनातनधर्मीय समाज चालत आहे व अस्पृश्यांनींहि आपआपलीं देवळें निराळीं ठेविलीं आहेत, व इतर जातींच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला नाहीं. काशी, पंढरपूर, वगैरे मोठमोठ्या क्षेत्रांतही अद्यापपर्यंत अस्पृश्यांना देवळांत येऊं देण्याचा प्रघात पडलेला दिसून येत नाहीं. हल्लींच्या काळांत हा प्रश्‍न सनातनधर्मीय बहुजनसमाजाएुढें आलेला आहे व सनातनधर्मीय सर्व समाजाचे या प्रश्नांसंबंधीं

एकमत झालेलें दिसून आल्यांशिवाय पूर्वापार अनेक वर्षे चालत आलेली वहिवाट

मोडून टाकतां येत नाहीं व या प्रश्‍नाचा निकाल आजच करतां येत नाहीं, याबद्दल या सभेस दिलगिरी वाटते. “ यानंतर उमरावतीचे सुप्रसिद्ध नागरिक श्री. दादासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ता. २७-७-१९२७ रोजीं अस्पृश्यांची एक जाहीर सभा भरवून श्री अंबादेवीच्या देवस्थान-फमिटीकडे दुसरा एक अर्ज करण्यांत आला. त्यांत अस्पृश्यांना पंधरा दिवसांच्या आंत श्री अंबादेवीच्या देवालयांत जाऊं न दिल्यास अस्पृश्य लोक त्या बाबतींत सत्याग्रह करतील अशा अर्थाचा एक ठराव देवस्थान-कमिटीकडे पाठविण्यांत आला. त्यावर ता. २१-८-१९२७ रोजीं देवस्थान-कमिटीनें खालील ठराव पास केला. या