वहाडातील ब्राह्मणेतर . . . जागता आहे २४५ शकेल. असे लोक सहाय्यकर्ते असतांना आमच्या उमरावतीकर अस्पृश्यबंधूंनीं श्रीअंबादेवीच्या देवळांत प्रवेश करून घेण्याचा प्रयत्न केला नाहीं तर स्पृश्य लोक अस्पृश्यता काढून टाकण्यास तयार नाहींत असें म्हणण्याऐवजीं अस्पृश्य लोक
आपली अस्पृश्यता घालवून देण्यास तयार नाहींत असें म्हणावे लागेल.
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. २ सप्टेंबर १९२७.