शुद्धीकरणवाल्यांच्या खोट्या धर्माचे मरण आज येणारे उद्यांवर जाईल पण अमर राहत नाहीं हे खास ! - Page 290

५९
शुद्धीकरणवाल्यांच्या खोट्या [धर्माचे ] [मरण ]
आज येणारे उद्यांवर जाईल पण
अमर राहत नाहीं हे खास !

वासरू जसें एकदां सडकून दूध प्यालें कीं, त्यांच्या आंगांत वारें शिरतें व तें बेभान इकडून तिकडे नाचावयास लागतें. तसेंच शुद्धिकार्यास सुरवात झाल्यापासून सनातन धर्मवाद्यांच्या मनांत एक प्रकारचें वेडसरपणाचे वारें खेळू

amend दिसून येत आहे. आजवर फक्त हिंदुस्थानांतील मुसलमान

लोकांनाच हिंदुधर्माच्या गर्तेत ओढून घेण्याची शुद्धिकार्यवाल्यांची प्रतिज्ञा होती ; परंतु कमाल पाशानें तुर्कस्थानांत कोणाला कोणत्याही धर्माचा पुरस्कार करण्याची मुभा दिली आहे. त्याबरोबर शुद्धीच्या वेडाच्या वाऱ्यात कांहीं सनातनी लोकांना तुर्कांची शुद्धि करून त्यांना हिंदु करण्यासाठीं तुर्कस्तानांत जाण्याची उत्कंठा झाली आहे. हा सगळा प्रकार पाहिला म्हणजे हिंदु सभा हिंदुसमाज समर्थ करू शकेल याबद्दल जबरदस्त शंका येते. हिंदु सभेच्या कार्याची संघटना व शुद्धि अशीं दोन कार्ये आहेत. या दोन कार्यापैकीं आमच्या मतें संघटना हेंच जास्त महत्त्वाचें कार्य आहे. आमचें तर असें मत आहे कीं, हिदूंनीं आपलें संघटन केलें तर शुद्धीची कांहींच आवश्यकता उरणार नाहीं. शुद्धीकरणाचा मुख्य हेतु म्हणजे हिंदूंचें संख्याबल वाढविणें हा होय. हिंदु मुसलमानांच्या दंग्यांत हिंदूंची जी दाणादाण होते ती हिंदु लोक अल्पसंख्यांक आहेत म्हणून होते असें जर म्हणता येईल तर हिंदु समाजाच्या तरणोपायास शुद्धि अवश्य आहे हें कबूल करावें लागेल. पण हिंदु लोक बहुसंख्यांक असून त्यांना ज्यांच्याकडून मार खावा लागत आहे, तेच मुसलमान लोक अल्पसंख्यांक आहेत ही वस्तुस्थिति जर हिंदु महासभेचे लोक नुसते डोळे उघडे ठेवून ध्यानांत घेतील तर त्यांना कळून येईल कीं, हिंदु समाजास समर्थ करण्यास शुद्धीची आवश्यकता नाहीं.

इतकेच नव्हे तर आम्ही असेंही सांगूं शकतों कीं, हिंदुसमाजाची संघटना झाल्याशिवाय शुद्धीचें कार्य केव्हांही यशस्वी होणार नाहीं. याचें कारण थोड्या विचारांती सहज कळून येण्यासारखें आहे. तुलनात्मक दृष्टीनें ज्यांनीं हिंदु