शुद्धीकरणवाल्यांच्या खोट्या धर्माचे मरण आज येणारे उद्यांवर जाईल पण अमर राहत नाहीं हे खास ! - Page 291

शुद्धीकरणावाल्यांच्या खोट्या . . . हे खास २४७

धर्माचा अभ्यास केला आहे त्यांच्याकडून असें सांगण्यांत येतें कीं, हिंदुधर्मांत व इतर धर्मांत जो एक महत्त्वाचा फरक आहे तो हा कीं, हिंदुधर्म हा जसे इतर धर्म शोधक धर्म आहेत तसा हिंदुधर्म हा शोधक धर्म नाहीं. ह्या मतास विशेष कांहीं आधार आहे असें नाहीं. आधार काय तो इतकाच कीं, आज कितीएक शतकांपासून शुद्धीकरण झाल्याने हिंदुत्व पावल्याचें उदाहरण घडलेले नाहीं ; पण एवढ्यावरून हिंदुधर्म हा केव्हांही शोधकधर्म नव्हता असें म्हणतां येणें शक्‍य नाहीं. उत्तर हिंदुस्थानाच्या एका टोंकावर राहाणाऱ्या मूठभर आर्यांचा धर्म सारा हिदुस्थान देश व्यापून उरला ही असाधारण गोष्ट हिंदुधर्म शोधक असल्याशिवाय घडली असेल हें असंभवनीय आहे. आर्यांपासून संस्कृतीनें, रूपरेखेनें, रंगानें अगदी निराळे असणारे द्रवीड लोक ज्या हिंदुधर्माने आत्मसात्‌ करून घेतले तो हिंदुधर्म कांहीं शतकांपूर्वी तरी शोधकधर्म असलाच पाहिजे. तेव्हां विचारांत घेण्यासारखा प्रश्‍न जो आहे तो हा की, एके काळीं, शोधक असलेला हिंदुधर्म शुद्धीस प्रतिकूल कां झाला ?

याचें उत्तर आमच्या मतें अगदी सोपें आहे. शुद्धीकरणास सामाजिक परिस्थिति एकवर्णी असावी लागते. कोणी परकीय मनुष्य एक धर्म सोडून शुद्धीकरणाद्वारें दुसऱ्या धर्मात गेला तर त्या धर्मांत त्याचे सामाजिक व्यवहार घडून आले पाहिजेत. म्हणजे त्यांच्यांत व मूळधर्मीयात रोटी-बेटी व्यवहार होणें अवश्य आहे. व समाज एकवर्णी असल्याशिवाय परस्परांत रोटी-बेटी व्यवहार घडणें शक्य नाही. हाच न्याय हिंदु धर्मास लागू केला असतां असें दिसून येईल कीं,

जोपर्यंत हिंदुसमाज एकवर्णी होता तोंपर्यंत त्याला शुद्धीकरणाचे कार्य करतां आलें. तेच एक वर्णाचे चार वर्ण व चार वर्णांच्या चार हजार जाती झाल्या त्यावेळीं शुद्धीकरणाचे कार्य आपो-आप बंद झालें. तें बंद होणें अपरिहार्य आहे. कारण जेथें एकवर्णी समाजाच्या चार हजार जाती झाल्या तेथें शुद्धीकरणद्वारें हिंदुधर्मांत येऊ पाहाणाऱ्या परधर्मीयांस कोणत्या जातींत व कोणत्या धर्मात जागा द्यावयाची या नडीच्या WAR कांहीं तोडच सांपडत नाहीं. याला जी एक तोड आहे ती हीच कीं, हिंदुसमाज एकवर्णी करणें ; म्हणजे आधीं संघटणेच्या कार्याला हात घालणें हेंच होय. आमच्या शुद्धिकरणवाल्या लोकांना वरील युक्तिवाद

कळत नाहीं किंवा पटत नाहीं अशांतला कांही भाग नाहीं. परंतु हिंदुसमाजाची

घडी आहे तशी कायम ठेवून हिंदुधर्मावर महंमदीधर्मीयांकडून मिळणाऱ्या हल्ल्यांचा प्रतिकार करावयाचा आहे, एवढाच त्यांचा हेतु आहे. नाहीं तर त्यांनीं संघटणेच्या कार्याकडे दुर्लक्ष करून घरची घाण उपसून टाकण्याऐवजीं तुर्कस्थानाची शुद्धि