ब्राह्मणांच्या अन्याय वर्तनावर टीका करणारे ब्राह्मणेतर अस्पृश्यांवर कांहीं कमी अन्याय करीत नाहींत. - Page 293

६ oO

ब्राह्मणांच्या अन्याय वर्तनावर टीका करणारे आह्मणेतर

अस्पृश्यांवर कांहीं कमी अन्याय करीत नाहींत

हिंदुस्थानांतील ज्या कांहीं प्रांतांत ब्राह्मणेतर चळवळ चालू आहे त्यांत मद्रास इलाख्यांत ती जितक्या जोरानें चालू आहे तितक्या जोरानें दुसरीकडे HST चालू नाहीं. या मद्रास येथील ब्राह्मणेतर पक्षानें स्वत:स ब्राह्मणेतर पक्ष म्हणविण्याऐवजीं स्वतःस जस्टिस पक्ष म्हणजे न्यायपक्ष असें नांव घेऊन आपल्या कार्यास सुरवात केली होती. न्यायासाठी झगडा करावयास सिद्ध झालेले लोक ज्या अस्पृश्यांना सर्वापेक्षां जास्त अन्याय सोसावा लागत आहे त्यांना मदत करून त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करतील अशी सबळ आशा वाटत होती ; परंतु दुर्दैवाची गोष्ट ही कीं, न्याय करण्याच्या सबबीवर अधिकारारूढ झालेल्या या लोकांनीं ब्राह्मणांविरूद्ध मद्रास एथील अस्पृश्यांना कांहीं मदत तर केली नाहींच पण अस्पृश्यांना ज्या सवलती देण्याचे सामर्थ्य त्यांच्या हातीं होतें त्या सवलती देण्याचा उदारपणादेखील त्यांना दाखवतां आला नाहीं. याचें उदाहरण नुकतेंच घडून आलें आहें. कांहीं वर्षांपूर्वी पच्चाप्पा नांवाच्या एका ब्राह्मणेतर गृहस्थाने एक मोठा निधि ठेविला होता व त्यांतून ब्राह्मणेतर वर्गाच्या शिक्षणाची तरतूद करण्यांत यावी अशी इच्छा प्रदर्शित केली होती. त्याप्रमाणें व्यवस्था होऊन एक कॉलेज व कांहीं शाळा चालविण्यांत येत आहेत. ह्या शाळा व कॉलेज यांची व्यवस्था ठेवण्याकरितां एक पंचमंडळ नेमण्यांत आलेलें आहे. चालू सालीं एक पंचम जातीच्या एका विद्यार्थ्यांने पच्चाप्पा कॉलेजमध्ये आपला प्रवेश व्हावा म्हणून कॉलेजच्या प्रिन्सिपालकडें अर्ज केला. या अस्पृश्य जातीच्या मुलास कॉलेजमध्ये घेणें त्यास जोखमीचें वाटल्यावरून त्यानें ही बाब पंच कमिटीकडे निकालांत काढण्यासाठी पाठवून दिली. या पंचकमिटींत ब्राह्मणेतरांचे बहुमत आहे. असें असतांनाहि अस्पृश्य विद्यार्थ्यांस पच्चाप्पा कॉलेजमध्यें घेतां येत नाहीं असा निकाल दिला. या निकालाविरूद्ध मद्रास हायकोर्टाकडे फिर्याद दाखल करण्यांत आली होती व त्यांत अस्पृश्यविद्यार्थ्यास पच्चाप्पा कॉलेजमध्ये घेण्यास कोणतीच हरकत नाहीं असा निकाल देण्यात आल्याचें कळते. तथापि एवढी गोष्ट ध्यानांत