महार आणि त्यांचे वतन - Page 298

२५४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

समज होणे शक्‍य आहे पण तो समज खरा नाही. नाशिक जिल्ह्यांतील देवळें येथील महार लोकांनी आपण मामलेदार साहेबांच्या घोड्याचा खरारा करणार नाहीं असा आग्रह धरल्यामुळे बरीच भानगड उपस्थित झाली होती. त्यात खरारा करण्याचे काम सरकारी नाही हे खास, अशी मनाशी गांठ बांधून आमची कामे काय तीं लिहून द्या असे महारांनी मोठ्या दिमाखाने सरकारी अधिकाऱ्यांस विचारलें. पण लिहून आलेली कामाची यादी वाचून पाहतात तों त्यात खरारा आहेत ! याचे कोणासहि आश्चर्य वाटण्याचें कांहीच कारण नाही. महारांच्या कामाची व्याख्याच इतकी ढोबळ करण्यात आली आहे की त्यात वाटेल ते काम व्याख्येला बाध न आणता घुसडून देता येण्यासारखे आहे. कोणत्याहि अंमलदाराला वाटेंला लावणें अर्थात तो अधिकारी टांग्यांत किंवा घोड्यावरून जात असल्यास त्याच्या घोड्याबरोबर अथवा टांग्याबरोबर एका मुक्कामाहून दुसर्‍या मुक्कामापर्यंत धावतं जाणें हें महारांनी करावयाच्या सरकारी कामांपैकी एक काम आहे असे गणले जातें. रिकामे जाणे झाले तर थोर नशीब ! नाही तर माथ्यावर बिगार असावयाचीच. बिगार ही कायद्यात कोठेच सांगितली नाही. पण अंमलदारांचा बंदोबस्त ठेवणे व ते सांगतील ती कामे करणे या

agaa वेठबिगारीचा समावेश होतो. ही बिगार म्हणजे बेबंदशाही आहे. तिला

धरबंध कांहीच नाही ! उपरनिर्दिष्ट देवळें येथील महार लोकांनी कलेक्टरकडे केलेल्या अर्जात ज्या प्रकारच्या बिगारीसाठी आपल्याला ताबडण्यात येतें अशी तक्रार केलेली आहे, त्याचा तपशील देतांना. (१) जोड्यांच्या बिगारी; (२) बुटांच्या बिगारी; (३) म्हशींच्या बिगारी; (४) गाईंच्या बिगारी; (५) बकऱ्यांच्या बिगारी ; (६) घोड्यांच्या बिगारी ; (७) बैलांच्या बिगारी; (८) राघू मैनांच्या पिंजऱ्यांच्या बिगारी; (९) पाळीव हरणांच्या बिगारी; (१०) कुत्र्यांच्या बिगारी ; (११) पलंगाच्या बिगारी ; (१२) पेट्यांच्या बिगारी ; (१३) भांड्यांच्या बिगारी ; (१४) मुलींच्या बिगारी ; (१५) मुलांच्या बिगारी; (१६) जात्यांच्या बिगारी ; (१७) शिपायांच्या गळ्यांतल्या पोतड्याच्या बिगारी ; (१८) बंदुकीच्या बिगारी ; (१९) तलवारीच्या बिगारी ; (२०) कांद्याच्या बिगारी ; (२१) भाजीच्या बिगारी ; (२२) चाकांच्या बिगारी ; (२३) आंब्यांच्या बिगारी ; (२४) लाकडांच्या बिगारी ; (२५) कंबरेच्या पट्ट्यांची बिगारी ; (२६) जाजमांच्या बिगारी ; (२७) कपड्यांच्या बिगारी ; (२८) पार्सलाच्या बिगारी ; (२९) उसांच्या बिगारी ; (३०) चाबकांच्या बिगारी ; (३१) नांगराच्या बिगारी ; (३२) खुर्च्याँच्या बिगारी ; (३३) फळांच्या त्रिगारी ; (३४) बाजेच्या बिगारी ; (३५) माचवेबाज यांच्या बिगारी; (३६) खोगिरांच्या बिगारी; (३७) टेबलांच्या बिगारी; (३८) पोत्यांच्या बिगारी ; (३९) गाडीचे जूंचे बिगारी ; (४०) सबळा जोते यांच्या