महार आणि त्यांचे वतन - Page 301

महार आणि त्यांचे वतन २५७

वतनदार महार लोकांच्या कामासंबंधाने जो दुसरा एक चमत्कारिक प्रकार आढळून येतो तो असा कीं,

महार म्हटला म्हणजे तो दोन घरचा चाकर !

कोणत्याहि गांवच्या महार वतन प्रोसिडिंगाची छाननी केली तर सरकारी कामाबरोबरच खालीलप्रमाणे रयतेची कामें करण्याचें ठरवून दिल्याचे दिसून येतें :

(१) खळी तयार करण्यास रयत लोकांस मदत करणे.

(२) रयतेपैकी कोणी मरण पावल्यास त्याला जाळण्यासाठी लांकडे वाहून

नेणें.

(३) मयताच्या नातेवाइकांस मयताची वर्दी देणें.

(४) मेलेलीं जनावरे ओढून टाकणें.

(५) लग्न प्रसंगी लाकडे फोडणे.

(६) इतर मामूल कामें करणें.

खरें म्हटलें असतां वतनदार म्हणजे सरकार उपयुक्त गांवकामगार असे वतन

Jia सरकारनेच ठरवून टाकलें आहे. इंग्रजी अमदानींत वतनदारांची

झाडबाकी करतांना फक्त सरकार उपयुक्त गांवकामगारांनाच राखण्यांत आले व बाकीच्यांना रयतेत मिळवून दिलें, हे सरकारी दप्तरावरून सिद्ध होत आहे. त्याप्रमाणें गांवकामगार सरकारी कामें करण्यासच काय ते जबाबदार आहेत. पाटील व कुळकर्णी या दोन वतनदार गांवकामगारांना सरकारी कामाशिवाय दुसरी कोणतीच कामें करावीं लागत नाहीत. पाटील कुळकर्ण्याप्रमाणें महार हे देखील सरकार उपयुक्त कामगार आहेत अशा सबबीवरच यांना राखण्यांत आलेले आहेत. असें असतां सरकारी कामाशिवाय रयतेची खासगी कामें करावयास सरकार कां भाग पाडतें याचें कारण काय असावें कळत नाहीं. अशा प्रकारच्या अन्यायास वतन अॅक्टांतून कांहीच आधार देतां येत नाहीं. कदाचित्‌ वतन अॅक्टाच्या कलम १८ च्या अन्वये हें घडत असेल. त्या कलमांत असें ठरविण्यात आलें आहे कीं, ज्या गांवकामगारांची वतनाची सगळी माल मिळकत किंवा तिजपैकीं कोणतीही माल मिळकत लोकांकडून परभारे नक्त किंवा ऐन जिनसी ऐवज घेण्याचा हक्क असेल (यावरुन हें कायद्याचें कलम महार लोकांस

लागू आहे हें उघड आहे) अशा लोकांच्या हक्कांचा व कर्तव्य कर्मे करावयाची त्यांचा

प्रकार व मान आणि ऐवज देण्यास तीं कर्तव्यकर्ते करण्यास कोण पात्र आहेत हैं पंचाईतीकडून निश्चित करण्यांत यावें. परंतु रयतेकडून WAR महार लोक

डब्ल्यू-२०७३-१७ अ