२५८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
हक्क आणि बलुते उकळतात म्हणून महार लोक रयतेचीं कामें करण्यास जबाबदार आहेत असें म्हणणे म्हणजे वतन अॅक्टाचा विपर्यास करण्यासारखें आहें. वतनदार म्हणजे वंशपरंपरेने सरकार उपयोगी कामें करणारा हक्कदार माणूस असें वतन अक्टाच्या कलम ४ मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. मग त्याची वतनी मिळकत कोणत्याहि स्वरूपाची असो. सरकारनें दिलेली मिळकत असो किंवा रयतेकडून परभारे उकलून घेतलेली मिळकत असो, तो सरकार उपयुक्त कामगार म्हणून राखून ठेवण्यात आला असेल तर त्याच्या कामाची व्यवस्था वतन अॅक्टाच्या ४ थ्या कलमाप्रमाणे व्हावयास पाहिजे ; म्हणजे त्यास सरकारी कामाशिवाय इतरांची खासगी कामे करण्यास भाग पाडतां येऊ नये.
इतरांची खासगी कामें करण्यास भाग पाडण्यांत येणें हे गैर तर आहेच, पण तीं कामे ठरवितांना इष्टानिष्ट याकडे सरकारकडून बेपरवाई तरी व्हावयास नको होती. वर सांगितलेल्या रयतेच्या खासगी कामा पैकीं दोनच घ्या : मयताची वर्दी देणें व मेलेली जनावरें ओढणें. मयताची वर्दी देण्याचें काम महारावर लादणें कोणत्याहि दृष्टीने इष्ट आहे असें दिसत नाहीं. शहरांत कोणाच्याहि घरीं मयत झालें तर टपाल मार्फत जो तो मयताची खबर आपापल्या नातेवाईकांस देतो. मग खेड्यांतील मुडद्याचीच काय एवढी मातब्बरी असावीं कीं त्याच्या मेल्याची सांगी महारानें पायपिटी करून पांचपांच दहादहा कोसांवर राहणाऱ्या त्यांच्या सग्यासोयऱ्यास तोंडानें कळवावी ! ! जें काम शहरांत टपालाने होतें त्याच कामाला खेड्यांत जासूद लागावा हें आश्चर्य नव्हे काय ? हा कदाचित् रयतेच्या मानापमानाचा प्रश्न असेल. पण या खुळ्या समजुतीला सरकारचें अनुमोदन असावें हे बेजबाबदारपणाचें लक्षण आहे असें म्हटल्यास वावगें होईल काय ?
सन १८८८ च्या तारीख २८ जूनच्या नं. ४२७३ च्या सरकारी ठरावा अन्वये कलेक्टर वगैरे अधिकारी वर्गास असा इशारा देण्यांत आलेला आहे कीं, गांवच्या सफाईच्या बाबतींत महार लोकांकडून जीं मामूल शिरस्त्याप्रमाणें करवून घ्यावयाची कामें आहेत तीं रयतेची खासगी कामे आहेत सरकारी नाहींत असा त्यांचा समज होऊं देऊ नये. याचा उघड अर्थ असा कीं मेलेलीं गुरें ओढणें हीं सरकारी कामें आहेत व तीं महारांनी गांवकामगार म्हणून करणें भाग आहे. रयतेच्या इतर कामांप्रमाणे हें काम देखील वतन अँक्टांत वतनदार या शब्दाच्या दिलेल्या व्याख्येवरून सरकारी काम होत नाहीं हें मागें सांगितलें आहे. गैर कायदा असूनहि केवळ रयत लोक मेलेली SX ओठणें आपल्याला शोभत नाहीं या भावनेने प्रेरीत होऊन आपलीं मेलेली ढोरें ओढावयाचें नाकारतात.
ड़ब्ल्यू-२०७३-१७ ब