महार आणि त्यांचे वतन - Page 307

महार आणि त्यांचे वतन २६३

ORG किंवा सूट देतें. पण जेव्हा जेव्हां सरकार कराची सुट रयतेला देतें तेव्हा

तेव्हां बलूत्याचीहि सुट रयतेला देण्यात येते. दुष्काळांत कराची लुट रयतेला देणे हें योग्य आहे. परंतु बलुत्याचीहि सुट देणे सर्वस्वी रास्त आहे असें म्हणता येणार नाही. यात रयतेचा फायदा आहे. पण महारांचे काय ? महार काम करावयाचे ते करतातच. उलट दुष्काळांत इतर दिवसांपेक्षा काम जास्त म्हणून खरें म्हटलें असतां महारांना दुष्काळांत वेतन जास्त मिळावयास पाहिजे. पण तसें कांहीं न होता केवळ दुष्काळ म्हणून काम जास्त व पगार कमी असा प्रकार घडतो. महार हे सरकारी नोकर आहेत. दुष्काळ पडला आणि सरकारी वसुल कमी झाला म्हणून सरकार कांहीं आपल्या नोकरांना पगार कमी घ्या म्हणून सांगत नाही. मग महारांच्याच बाबतींत हा अन्याय कां असावा ? अशा प्रकारचें हे महारांचे वतन आहें. त्यात सुधारणा करून ते कायम ठेवावें किंवा तें अजिबाद खालसा करावें ह्या प्रश्नाचा अखेरचा निंकाल लावणे हें महार जातीच्या उन्नतीच्या दृष्टीनें अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. इतर कोणाचे या बाबतीत काय मत असेल तें असों पण आम्ही

महार वतन खालसा कराव

या मताचें आहोंत. वतन ही अत्यंत जिव्हाळ्याची चीज आहे. कोणीहि वतनदार वर्ग आपलें वतन सोडून देण्यास तयार होणार नाहीं. इतकेच नव्हे तर वतनासाठीं आपला प्राण देण्यास कमी करणार नाहीं, हें आम्हीं जाणून आहों. गळ्यांत नांगर घालून वतनदारांच्या लेकी बहीणींना आळवून पै पैशाची भिक्षा मागून गेलेलें वतन परत मिळविणारे वतनदार फकीर आजहि आपल्या दृष्टीस पडतात. जेथें वतनाचा ओढा इतका जबरदस्त आहे, जेथें पाटील आपलें वतन सोडण्यास तयार नाहीं, जेथें कुळकर्णी गेलेले वतन परत मिळविण्यास सारखी खटाटोप करीत आहे तेथें महारांच्या पुढाऱ्यांनींच महाराचे वतन खालसा करण्यांत यावें असें सांगणें हा प्रकार बराचसा विलक्षण वाटेल व कांहीं लोक आम्ही आमच्या लोकांचे हितशत्रु आहोंत म्हणून आम्हाला दोष देतील. परंतु आमचें मत अशा प्रकारचे व्हावयास आमच्या जवळ कारणेहि तशी सबळ आहेत. तीं कोणतीं हे कळलें म्हणजे आम्ही महार वतन खालसा करावें असें जें म्हणतो तें महार लोकांचे हित व्हावे म्हणूनच म्हणतों अशी सर्वांचीच खात्री होईल.

महार वतन खालसा करण्याचें पहिलें कारण असें कीं या वतनामुळे महार स्वाभिमानशून्य झाले आहेत. स्वाभिमानाच्या दृष्टीनें जर महार वतनाकडे पाहिलें तर त्यांत अत्यंत अनिष्ट अशीं जर एखादी बाब असेल तर ती बलूत्याची पद्धत होय. महारांचा मुशाहिरा बलूत्याच्या रूपांत देण्यांत येत असल्या कारणाने