महार आणि त्यांचे वतन - Page 311

महार आणि त्यांचे वतन २६७

लागल्यामुळें अन्य वाटा आपल्याला मोकळ्या आहेत, याची महाराला आठवण देखील होत नाही. तीच वाट बंद झाली तर आज त्यांना दाही दिशा खुल्या होतील; आणि ज्या दिशेला दैव निघेल त्या दिशेला ते जातील, परंतु वेसकरकी जोपर्यंत त्यांच्या डोळ्यापुढें आहें तोंपर्यंत गतानुगतीच्या बंदिवासांतून त्यांची सुटका होणें शक्‍य नाहीं. म्हणून आम्ही म्हणतों कीं, खुजटलेला महारसमाज वाढीस लागावा हें जर इष्ट असेल तर प्रथमतः महारवतन खालसा झालें पाहिजे. ही विचारसरणी कांहीं लोकांना अविचारीपणाची वाटेल, व हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागा म्हणणें, हे व्यवहारशून्यतेचें लक्षण आहे, असेंहि ते आरोप करतील. परंतु हा युक्तिवाद भित्र्या लोकांचा आहे. ज्यांना साहसी वृत्तीची जोपासना करावयाची आहे त्यांच्या तो उपयोगाचा नाही. हाती असलेल्याचा मोह इतका जबर असतो कीं, तें सुटल्याखेरीज पळत्याच्या पाठीं कोणी लागत नाही; आणि पळत्याच्यापाठीं लागल्याशिवाय प्रगति होत नाहीं. म्हणून आधीं हातचे वतन सुटले पाहिजे. त्याशिवाय महारांना उन्नतीचा मार्ग सुचणार

नाहीं.

महारवतन खालसा करावें यास तिसरेंहि एक कारण आहे. तेंहें किं,

वतन गेल्याशिवाय महारांची सुधारणा होणें शक्‍य नाहीं.

वतन आहे तो पर्यंत महार लोक आपली सुधारणा करून घेण्यास तयार होणार नाहींत हें तर खरेंच पण इतर लोकहि वतनपद्धतीचा फायदा घेऊन महार जातीला सुधरूं देणार नाहींत हें म्हणणें कदाचित वरच्या वर्गाच्या लोकांना पटणार नाहीं. पण आमची या बाबतींत बालंबाल खात्री झाली आहे. आज अनेक दिवसांच्या चळवळीने कांहीं गांवच्या महार लोकांच्या मनावर परिणाम होऊन त्यांनीं स्वच्छ व स्वतंत्रपणाची राहणी स्वीकारण्याच्या हेतूनें गावातून भाकरी मागणें, मेलेली जनावरें ओढणें वगैरे वगैरे गलिच्छ व स्वाभिमान नष्ट करणारीं कामें सोडून देऊन आपल्या इभ्रतीनें वागण्यास सुरुवात केली आहे. महार लोक स्वतंत्र व स्वच्छ राहिल्यानें कोणाचेंहि खरें पाहिलें असतां नुकसान होण्यासारखें नाही. परंतु अशा रितीनें वागूं लागल्याने महार लोक आपल्या बरोबरीचे होतील अशा भीतीनें पछाडून जाऊन गांवांतील लोकांनीं संगनमत करून महारांनी केलेल्या क्षुल्लक अशा सुधारणेवरून AGA जाऊन त्यांना त्राहि भगवान केल्याचे अनेक प्रसंग आमच्या कानीं आलेले आहेत. एका ठिकाणीं एका महाराने आपल्या मुलीच्या लग्नांत कापडी मांडव घालून ग्यासबत्ती आणून लग्नसमारंभ पार पाडला. येवढ्या कारणावरुन गांवचे लोक चेतून जाऊन त्याला व त्याच्या आईला त्यांनीं बेदम मारलें. दुसऱ्या एका गावी महारानें आपल्या घरावर कोलें