महार आणि त्यांचे वतन २६९
याचा ऊहापोह येथवर झालेल्या विवेचनांत करण्यांत आला आहे. आज हें महारकी वतन कसें खालसा करावें या प्रश्नांचे विवेचन करून ही लेखमाला समाप्त करण्याचा आमचा विचार आहे. सरकारने ज्यापरी वतनदारीच्या हक्कांचे संरक्षण व्हावें अशी कायद्यांत तरतूद केली आहे, त्याच परी व वेळ पडल्यास वतन खालसा करण्याची तरतूद त्याच कायद्यात करून ठेवण्यात आली आहे. वरील प्रकारची तरतूद ज्या वतन कायद्याच्या पंधराव्या कलमांत केलेली आहे ते कलम पुढीलप्रमाणे आहे. “ कलेक्टर यांनी वतन धारण करणाऱ्या इसमाच्या लेखी, नमूद करून दिलेल्या संमतीने असा धारण करणारा व कलेक्टर यास कबूल असतील अशा अटींवर, मग त्या या कायद्यास अनुसरून असोत अगर नसोत, नोकरी करण्याच्या जोखमदारीतून त्यास, त्याच्या वारसास व त्याच्या यास्त्या वतनदारास कायमचे मुक्त करावे.” असें हें कलम मूळच्या वतनकायद्यांतच असल्यामुळे महारकी वतन खालसा करण्याकरिता एखादे नवीन कलम घडविण्याची काही जरूरी नाही. फक्त
कोणत्या अटींवर महारकी वतन खालसा करावयाचें.
त्या अटींची एक पुस्ती वरील कलमास जोडण्यांत आली म्हणजे झालें. या अटी उभयपक्षांत देवाण घेवाण झाल्याशिवाय ठरणें शक्य नाहीं. आणि ही देवाण घेवाण घडून येण्यास उभयपक्षाचें परस्पराविरूद्ध काय हक्क आहेत, याची कल्पना झाली पाहिजे. प्रथमतः, वतनदारांच्याबाजूने सांगावयाचे म्हणजे त्यांना अनुवंशिक नोकरीचा हक्क आहे. गांवात बाराबलुतेदारासह त्यांनी सर्व रयतेची व सरकारी कामें करावयाची, असें गांवगाड्याचे साधे सोपे वर्णन करण्याचा [प्रघात ] आहे. परंतु हे वर्णन एका दृष्टीने अर्थशून्य आहे, व त्यावरून खऱ्या वस्तुस्थितीचा बोध होत नाहीं. बलुतेदार रयतेची कामें करतात, हे तर खरेंच परंतु रयतेला आपल्या बलुतेदारांशिवाय इतरांकडून आपली कामें करून [घेतां ] [येत ] नाहीत, हेंहि तितकेंच खरें आहे. रयतेच्या घरी लग्न झालें व गांवांत वतनदार जोशी असला तर त्या वतनदार जोशास रयतेनें बोलविल्यास [येणें ] [भाग ] आहेच. रयतेला गावांतील वतनदार जोशाच्या हातून लग्न लावून [घेणें ] भाग आहे. त्याला वगळून दुसऱ्या कोणाकडून लग्न लावण्यांत आलें [तर ] [वतनदार ] जोशाला यजमानावर व लग्न लावणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांवर नुकसानभरपायीचा [दावा ] करण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त होतो. ग्रामजोशालाच काय, पण गांवातल्या वतनदार न्हाव्याला देखील तशाच [प्रकारचा ] [अधिकार ] [आहे. ] वाटेल त्या न्हाव्याकडून आपण हजामत करून घेऊ असे [रयतेला ] [वाटणें ] [अगदी ] [साहजिक ] आहे परंतु हा समज कसा भ्रामक [आहे ] [हें ] [सन ] [१९१९ ] [साली ] [मुंबई ] [हायकोर्टाने ]