महार आणि त्यांचे वतन - Page 315

महार आणि त्यांचे वतन २७१

काम करण्याचा आनुवंशिक हक्क हा स्थावरमिळकतीच्या स्वरूपाचा आहे, असें कायद्यानें मानण्यांत येतें. अर्थात्‌ ही स्थावर मिळकत विनामूल्य कोणासहि काढून घेता येणार नाही. येथवर सरकारनें महारांचे वतन म्हणजे त्यांचा नोकरी करण्याचा आनुवंशिक san कमी केला तर महारांना काय करतां येईल, याचा विचार करण्यांत आला आहे. आतां, महारांनी आपखुषीनें वतन सोडून दिलें तर सरकार काय करूं शकेल, याचा विचार करावयाचा आहे. सरकार व वतनदार या उभयतांतील नातें धनी व नोकर या मासल्याचें आहे. हें ध्यानांत घेतलें म्हणजे या प्रश्नाचा उलगडा सहज होऊ शकतो. नोकरांनें नोकरी करण्याचे बंद केलें तर त्याचा धनी त्यास पगार देण्याचें बंद करतो, हा उघडा न्याय कोणासहि विशद करून सांगण्याचे कारण नाही. त्याच न्यायाने पाहतां, जर महारांनी काम करण्याचे बंद केले तर सरकार त्यांना देत असलेला मुशाहिराहि बंद करील. म्हणजे महारांचे बलुतें जाईल, इनाम जमीन जाईल व मिळत असलेला नक्त पगारहि जाईल.

परस्परांचें एकमेकाविरुद्ध कशा प्रकारचे हक्क आहेत याचें स्पष्टीकरण येथवर करण्यांत आलें आहे. महार-वतन खालसा करण्याच्या बाबतींत उभयपक्षांपैकीं कोणी काय सोडून द्यावें, हें ठरविणें जर आमच्यावर सॉपविण्यांत आलें तर आम्हीं असा निकाल सांगू की, महारांनीं काम सुटल्यामुळे सरकारविरुद्ध नुकसानभरपाई मागूं नये ; व सरकारने महारांनीं नोकरी बंद केल्याबद्दल त्यांचे बलुतें व पगार बंद करावा, पण त्यांच्या इनामी जमिनी कादून घेऊ नयेत. या अटींवर महारवतन खालसा होईल तर उत्तम. कारण तें सहज होण्यासारखे आहे. महारवतनांत एवढे मोठे दोष असतांनाही महार लोक वतन सोडण्यास अनमान कां करतात ? याची चौकशी केली असतां साधारणपणें असें दिसून येते कीं, वतन सोडलें असतां आपल्या इनाम जमिनी जातील अशी भीति महार लोकांना वाटत असते. वतन गेलें आणि त्याबरोबर पगारहि गेला, बलुतेहि गेलें, व जमीनहि गेली तरी त्याची पर्वा महार लोकांना नाहीं, ही गोष्ट विसरून चालावयाचें नाहीं. जमिनीची जर त्यांनीं पर्वा ठेविली नाहीं तर फटक्यासरशी एका अर्जाबरोबर त्यांना वतनाचा राजीनामा देता येईल ; आणि एवढा त्याग जर महार लोकांनी केला तर त्यांना आपली सुटका करून घेण्यास सरकारची दाढी धरण्याचे कांहींच प्रयोजन उरणार नाहीं. पण महार जात सर्व अस्पृश्य जातीत घोर RSI व्यापलेली जात आहे. इतर अस्पृश्य जातींना कोणता तरी एक धंदा आहे. महार जातींच्या वाटणीस मात्र एकहि धंदा आला नाही. अशा स्थितींत उपजीविकेचें कोणतेंच साधन हातीं नसतांना महार जातीनें वतनी जमीनीचा सोस धरणें साहजिक आहे. परंतु या परिस्थितीचा फायदा घेऊन