महार आणि त्यांचे वतन २७३
वतन सोडण्यास कोणीही तयार नाहीं. उलट गेलेले वतन परत मिळविण्यासाठी कुळकर्णी वतनदार कसे अहर्निश झटत आहेत हें पाहून महारकी वतन खालसा करण्यापेक्षां त्यांत सुधारणा करणें बरें नव्हे काय? असा कोणी प्रश्न करील. आम्ही महारवतनाच्या विरुद्ध आहोत म्हणून,
महारवतनांत सुधारणा करण्यापेक्षा तें खालसा करणें बरें
असे आमचे स्पष्ट मत आहे. महारकी वतन हे उत्सर्गकारी कारणांपैकी एक कारण असतें, तर त्याची सुधारणा करण्याचे उपाय आम्ही सुचविले असते. पण ते उपसर्गकारी कारणापैकी एक मोठेच प्रबळ कारण आहे. त्याचा लोप झाल्याशिवाय महारांची अवनति टळणार नाही. तेव्हा त्याच्या सुधारणेच्या पाठीस लागण्यात कांही अर्थ नाही हे उघड आहे. झालाच तर अनर्थ होईल. कारण वतनात सुधारणा झाली तर अदूरदृष्टी महार जात वतनाचा त्याग करण्यास प्रवृत्त होण्याऐवजी वतनाला जास्त जास्त चिकटून रहाण्याचा संभव आहे. कुळकर्णीवतनात व महारवतनात कोणत्याच प्रकारचें साम्य नाही. एक त्यांच्या धारण करणारांस अधिकाराप्रत पोहोचविते तर दुसरें त्यांच्या धारण करणारांस मनानें तसे शरीराने गुलाम बनविते. तेव्हा कुळकर्णी लोक गेलेली वतनदारी परत मिळविण्यास झटतात म्हणून महारांनी आहे ती वतनदारी सांभाळून ठेवावी, असें केव्हांच म्हणता येणार नाही. कुळकर्णी लोक वतनासाठी झटतात, याचें कारण असें कीं, त्यांना वतनामुळे रयतेवर व महारांवर हुकमत प्राप्त होते. परंतु महारांच्या वतनामुळे त्यांना रयतेचें तसेंच अधिकाऱ्यांचे कायमचे ताबेदार व्हावे लागतें. सर्वांची हुकमत महारांवर पण महारांची हुकमत कोणावरच नाही. जन्मा आला हेला आणि पाणी वाहतां मेला, हीच त्याची _ गत. अंशा परिस्थितीची सुधारणा करून ती कायम करणे केव्हांहि हितावह होणार नाहीं. आम्हाला नमूद करण्यास आनंद वाटतो की, या बाबतींत आमचें जें मत आहे तेंच सरकारचें आहे. सन १९२५ साली माजी आमदार निकाळजे यांनी महारवतनदारांचा पगार दरमहा रुपये १५ असावा अशा प्रकारचा एक ठराव कायदे कौन्सिलांत आणला होता. त्यास सरकारतर्फे मि. मॉन्टफर्ड यांनी दिलेले उत्तर मनन करण्यासारखें आहे. ते म्हणाले, “ महार लोकांची उन्नति करण्याचें कार्य इतकें कठीण कां जातें याचा विचार केला असतां असें दिसून येईल की, खेडेगावांत राहणाऱ्या महार लोकांना स्वाभिमानाने व स्वावलंबनानें आपला संसार चालविण्याची मुळींच संवय नाहीं. महार लोक अत्यंत दरिद्री आहेत, ही गोष्ट खरी. परंतु जन्मल्यापासून मरेपर्यंत भिकेचा हक्क सांगून
डब्ल्यू-२०७३-१८ अ