महार आणि त्यांचे वतन - Page 318

२७४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

दुसऱ्यांनी दिलेल्या अन्नावर जगतो तो दरिद्री नसणार तर कसा असणार ? माझें असें स्पष्ट मत आहे की, गांवकीच्या बेडीला मुलामा देऊन महारांना आपली मान त्यांत कायमची गुंतविण्यास उत्तेजन देणारा हा ठराव मुळांतच चुकीचा आहे. महार लोकांना सुखी करावयाचें असेल तर ते गांवाला चिकटून न राहतां ते गांव सोडून जातील अशी व्यवस्था करणें जरूर आहे.“ परंतु महार वतन खालसा झालें तरच महार लोक गावांबाहेर जातील हे उघड आहे. अर्थात महारांच्या उन्नतीचा उपाय म्हणजे वतन खालसा करणें, सुधारणा नव्हें असेच माँटफर्ड साहेबांचे मत होते हें उघड आहे.

ज्या सुधारणांमुळे महार लोक वतनाला कायमचे चिकटून जातील अशा अनिष्ट सुधारणांच्या जरी आम्ही विरुद्ध आहोंत, तरी अशा

| कांही इष्ट सुधारणा

आम्हाला अवश्य दिसतात की, ज्या अमलांत आल्या असतांना महार लोकांच्या मनावर त्यांचा योग्य तो परिणाम होऊन ते वतन सोडून देण्यास तयार होतील. या इष्ट सुधारणांपैकी पहिली व महत्वाची सुधारणा ही की, महारांचे बलूते व भाकर डंद करून त्यांचे रुपांतर नक्त ऐवजांत करण्यांत यावें. खरें पाहिलें असतां महार लोकांचे बलूते आणि भाकर याचे नक्त ऐवजांत रुपांतर केव्हांच व्हावयास पाहिजे होते. इंग्रजी अमदानीच्यापूर्वी कोणत्याच प्रकारच्या वतनदार गांव कामगारांना कामाच्या मुशाहिऱ्या बद्दल नक्त ऐवज मिळत नसे. त्या ऐवजी त्यास काळी व पांढरी उकळून खाण्याचे हक्‍क असत. परंतु या काळी पांढरीच्या तगाद्याने नक्त इतकी गांजून गेली होती की, सन १८३९ च्या २० व्या कायद्या अन्वये उतनदारांचे काळीतील इक्क बंद करण्यात आले. त्याप्रमाणे पांढरी उकळण्याचे बंद करण्यांत यावें या इच्छेने सन १८४४ चा १९ वा कायदाहि पास करण्यांत आला. या कायद्याच्या अनुरोधाने पाटील व कुळकर्णी या दोन वतनदार गांव कामगारांचे काळीपांढरीतील हक्क सरकारनें बंद केले व त्याचे रूपांतर नक्त ऐवजांत करून त्याचें प्रमाण गांवचे वसुलावर ठरवून दिले, व तो सरकारी तिजोरीतून मिळविण्याचीही व्यवस्था केली. पण महार वतनदारांना मात्र हे कायदे सरकारनें लागू केले नाहींत, ते कां? याचे कारण कांहीं समजत नाहीं. परंतु कोणत्याही कारणामुळें हा भेदभाव आजवर ठेवण्यांत आला असला तरी तो यापुढें तरी ठेवण्यांत येऊ नये. ही सुधारणा घडून आल्यानें वतन म्हणजे नोकरी, भीक नव्हे, अशी भावना महारांच्या मनांत उत्पन्न होईल. एकदां बतनाला नोकरीचे स्वरूप प्राप्त झालें म्हणजे इतर नोकरीतून सुटका करून घेण्यास जसा नोकर वर्ग कचरत नाहीं तसेंच प्रसंगविशेषीं महारलोक ही वतनी नोकरी सोडून

डब्ल्यू-२०७३-१८ ब