ब्राह्मण्याचा उच्छेद झाल्याशिवाय हिदूंचे संघटण होणे दुरापास्त. - Page 320

६२

ब्राह्मण्याचा उच्छेद झाल्याशिवाय

हिंदूंचे संघटण होणे दुरापास्त

भाई परमानंद हे एकेकाळीं पंजाबांतील हिंदुमहासभेचे मोठे पुरस्कर्ते होते. परंतु थोडक्याच अवधींत त्यांना असें दिसून आलें कीं, हिंदु संघटणेचें कार्य हिंदु महासभेचे हातून पार पडणें शक्‍य नाहीं. कारण ब्राह्मण्याचा उच्छेद झाल्याशिवाय हिंदूंचे संघटण होणें दुरापास्त आहे. या ब्राह्मण्याचा उच्छेद करावयास ज्या रोटीबंद बेटीबंद तटबंद्यांच्या आत तें सुखरूपपणे नांदत आहे त्या उडवून दिल्या पाहिजेत हें निर्विवाद आहे. परंतु हिंदुंचे संघटण करावयास कंबर कसलेली हिंदु महासभा दर्भग्याच्या महाराजांच्या सनातन धर्म महामंडळाप्रमाणें संघटणेच्या आड येणाऱ्या ब्राह्मण्याला कापून काढण्याऐवजी त्याची जोपासनाच करू पाहते ! याचा sàn वाटून भाईपरमानंद यांनी “जातपात तोंडक मंडळ'' या नावाची संस्था स्थापन केली. तिच्या मार्फत संघटणेंचें कार्य चालू असतां त्यांनीं नुकतेंच एक 'हिंदु साम्यवाद मंडळ' उभारलें आहे. हें नवीनच काय आहे म्हणून भाई परमानंद यांना जिकडून तिकडून विचारपूस होत असतां उत्तरादाखल त्यांनीं एक खुलासेंयार जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यांत भाई परमानंद लिहितात, “मला वाटतें आजच्या काळांत हिंदु समाजरचनेत आमूलाग्र क्रांति घडवून आणणें अत्यंत जरूर आहे. समता आणि बंधुत्व यांचा संदेश सर्वत्र प्रसृत करतांना जरूर तर आपण जुन्या. शास्त्राज्ञाहि पाळूं नयेत. त्या शास्त्राज्ञादेखील तत्परिस्थितांत समाजसंवर्धनाला आवश्यक वाटल्या म्हणूनच प्रसृत केल्या होत्या. समाजसंरक्षण हें मुख्य साध्य असून शास्त्रज्ञा हें त्यांचे केवळ साधन होतें. अर्थातच परिस्थित्यनुरूप साधनांत फरक करणें अत्यावश्यक आहे. जन्मजात अधिकारांच्या रक्षणासाठी जे लोक भांडतात त्यांना तोंड देण्यासाठी ४ वर्षांपूर्वी 'जात-पात-तोडक मंडळ' स्थापन झालें होतें. जे जीर्णमतवादी आपल्या जन्मजातीचा वृथाभिमान बाळगून विधवा आणि कनिष्ठ वर्ग यांना माणुसकीनें वागविण्यास तयार नाहींत, त्यांना शह देणें हें या मंडळाचें कार्य आहे. हें जुनें 'जात-पात-तोडक मंडळ' म्हणजेच नवे “हिंदु साम्यवाद मंडळ' होय. त्या मंडळाचा पूर्वीचा हेतु विध्वंसक स्वरूपाचा होतः; अःगां समाजांतील असाम्यता