ब्राह्मण्याचा उच्छेद झाल्याशिवाय हिदूंचे संघटण होणे दुरापास्त. - Page 321

ब्राह्मण्याचा उच्छेद . . . होणे दुरापास्त २७७

नष्ट करून एकता, बंधुभाव आणि साम्यता निर्माण करणें असें विधायक ध्येय पुढें

ठेवलें आहे. अमेरिकेत जी यादवी (Civil war) झाली ती जगांतील गुलामगिरी

नष्ट करणें या सामाजिक प्रश्‍नावरच झाली. फ्रान्स देशांत क्रांति होण्यापूर्वीच

तेथील विचारप्रवर्तकांनी आपल्या बांधवास साम्यता आणि बंधुभाव याचें शिक्षण

दिलें होते. १८३२ साली इंग्लडांत जो सुधारणांचा कायदा अमलांत आला,

त्यानेंहि बरीच सामाजिक प्रगति झाली. त्याचप्रमाणें हिंदुस्थानांतील आपल्या

स्वराज्याच्या चळवळीचा अखेर निष्कर्ष हाच निघाला आहे की, आपण आपल्या

कोट्यावधि बांधवांना समानतेचे हक्क दिल्याखेरीज आपण राजकीय हक्कांस

लायक ठरत नाहीं. आपल्या हिंदुसंघटनाच्या चळवळीविषयीं असें म्हणतां

येईल कीं, मुसलमानांच्या जातिविषयक चळवळीला तोंड देण्यासाठी संघटन

पाहिजे या मुद्यावर जरी सर्वाचे एकमत असलें, तरी त्यामुळें हिंदुसमाजांत

संघशक्ति निर्माण झालेली नाही. जाति आणि धर्मपंथ यांची विध्वंसक शक्ति

संघटनापेक्षां अधिक सामर्थ्यवान ठरली असल्यामुळें उच्च नीच हे भेदभाव विसरून

जाऊन हिंदुसमाजाची समानतेच्या तत्त्वावर पुनर्घटना करणें हेंच आपलें कर्तव्य

ठरतें. इथून तिथून सारे हिंदू एकाच रक्तामांसाचे व त्यांचा इतिहासहि एकच

असून आज त्यांच्यावर अपूर्व आपत्तीला तोंड देण्याचा प्रसंग आला आहे या एकाच

भावनेनें ते बद्ध झाले पाहिजेत. आज हिंदु समाजापुढें तो जिवंत कसा राहिल,

हा प्रश्‍न आहे. अशा परिस्थितीत ज्यांनी त्यांनी आपल्या पूर्वजांच्या धर्मावर श्रद्धा

ठेवून व उज्वल भावितव्याचीं आशा करून परिस्थित्यनुरूप वागण्यास तयार

झालें पाहिजे.” |

आज इतके दिवस संघटणेचे बाबतीत हिंदु महासभेकडून जी फसवणूक होत

आहे तिचा विचार केला असतां भाई परमानंद यांच्या स्पष्टोक्तीबद्दल त्यांचें

अभिनंदन करणें जरूर आहे. ब्राह्मण्याचा त्याग केल्याशिवाय संघटण होणें शक्य नाहीं ही गोष्ट हिंदु महासभेवाल्यांस कळत नाहीं, अशांतला कांही भाग नाही. पण कांही गोष्टी कांही लोकांना इतक्या जिव्हाळ्याच्या वाटतात कीं, त्यांचा त्याग करणें तर राहोच पण नुसता त्यांच्या त्यागाविषयींचा विचार करणें देखील मनाला दु:खदायक होतें. हिंदुमहासभेला ब्राह्मण्य ही अशांच प्रकारची प्रिय झालेली चीज आहे. तिचा त्याग करण्याचा विचार हिंदु महासभेच्या मनाला शिवणें सुद्धां अशक्य आहे. हिंदु महासभा ही गोष्ट प्रांजलपणें जर कबूल करती तर तिला दूषण देण्याचें कांहीं कारण नव्हतें. कणंगीला हात लावूं नको व पोरेंहि उपाशीं

मारूं नको, असा अविचार सांगणारा कुणबी बापडा नेणताच होता. पण एकीकडे

ब्राह्मण्याला धक्का लावावयाचा नाहीं व दुसरीकडे तर संघटणा करण्याचा आंव