६३
सहभोजन "'गुपचूप'' न घेता तें जाहीर करावे
भाई परमानंद यांच्या जातपात तोडक ऊर्फ हिंदु साम्यवाद मंडळाचे हेतु व साधनें बऱ्याचशा हिंदु लोकांना पटत चाललीं आहेत ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. मुंबईत चिंचपोकळी येथील सोशल सर्व्हिस लीगच्या परेल शाखेनें चालविलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी व तालमीच्या खेळगड्यांनी चालू साली गणेश उत्सव साजरा केला होता. सार्वजनिक गणेश उत्सव ही अगदी अलीकडील बाब आहे. हिंदु धर्माचे असूनहि मुसलमानी मोहरमाचे वेळेस आपपर भाव सोडून देऊन त्यांच्या देवांस नवस सायास करण्याचा हिंदूंचा सांप्रदाय असे. परंतु प्रतिवर्षी मुसलमानांशी एकरूप होत असतांहि मुसलमान हिंदुंची कत्तल करण्यास कमी करीत नाहींत असें जेव्हां मुंबईतील हिंदुमुसलमानांच्या दंग्यांनंतर दिसून आलें तेव्हां लोकमान्य टिळकांनी हिंदूंना ताबूदापासून परावृत करावें, व उत्साह विकृत होणाऱ्या या लोकांना स्वधर्माशी संबंध असलेली अशी कांहीतरी नवीन करमणूक मिळवून द्यावी अशा उद्देशानें सार्वजनिक गणेश उत्सवाची प्राणप्रतिष्ठा केली. सार्वजनिक गणेश उत्सवाची पूर्वपीठिका ही अशी असल्यामुळे त्या उत्सवाचा रोख साधारणपणें मुसलमानांविरूद्ध असणें अगदीं सहाजिक आहे. आतां हा उत्सव हिंदुमहासभेच्या पंखाखाली साजरा होत असल्यानें तर गणेश उत्सव म्हणजे मुसलमानांविरूद्ध व्याख्यानांचे एक सत्रच आहे असा भास होऊ लागला आहे. चिंचपोकळी येथील या गणेश उत्सवांत मात्र घडलेला प्रकार या नेहमींच्या प्रकाराहून अगदी भिन्न होता. तेथें मुसलमानांविरूद्ध जप करण्याऐवजी ब्राह्मण्यावर गदा घातली गेली व सहभोजनाच्या द्वारें ब्राह्मण्याचें संरक्षण करण्यासाठी उभारलेल्या तटबंद्यांपैकी रोटीबंदीची तटबंदी उडवून देण्यांत आली. या सहभोजनांत ब्राह्मणापासून Wada सर्व जातीचें मीलन झालें eda. पण या सहभोजनांत आमच्या मतें दोन गोष्टी अपूर्व अशा झाल्या. पहिली अपूर्व गोष्ट म्हटली म्हणजे ही कीं, अस्पृश्यांनी WRIT जेऊ घातलें. स्पृश्यास्पृश्यांत जीं सहभोजनें होतात, त्यांत बहुधा स्वयंपाकी अथवा
यजमान कोणीतरी स्पृश्य गृहस्थ असतो. असल्या सहभोजनाला आमचें मतें
कांहींच महत्व नाहीं. सर्वच लोक आपल्याला ब्राह्मणाच्या उष्ट्याचे धनी